मुंबई : जानेवारीत मुंबई मॅरेथॉनसाठी सराव करताना हृदयविकाराचा झटका आल्याने प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राकेश सिन्हा यांचे निधन झाले. येत्या ११ तारखेला ते ६० वा वाढदिवस साजरा करणार होते. पण त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. मंजू सिन्हा, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. डॉ. सिन्हा यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी ५ वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.गेल्या चार वर्षांपासून डॉ. सिन्हा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत होते. वांद्रे येथील परिसरात सकाळी मॅरेथॉनचा सराव करत असताना ते अचानक कोसळले, त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या होली फॅमिली रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. एंडोस्कोपिक गायनाकॉलॉजीचे डॉ. सिन्हा प्रणेते होते. शरीराला अतिशय सूक्ष्म छिद्र पाडून लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञान त्यांनी भारतात आणले. (प्रतिनिधी)
स्त्रीरोगतज्ज्ञ राकेश सिन्हा यांचे निधन
By admin | Published: December 28, 2016 3:41 AM