ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात जय शिवाजी... जय भवानीचा जयघोष करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. ठाण्यातील मासुंदा तलाव, कळवानाका येथील शिवाजी महारांजाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आली. तसेच काही ठिकाणी या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यात गडकरी रंगायतन मध्ये शहरातील विविध शाळांनी पारंपारिक नृत्ये सादर केली. त्यानंतर पुरस्कार प्रदान सोहळा पार पाडला. यात मंडळाचा मानाचा मराठा समाज भूषण पुरस्कार सावंतवाडी मराठा समाज या संस्थेचे अध्यक्ष इंद्रजित सावंत आणि महाराष्ट्रातील अग्रगण्य शिवकृपा सहकारी पतपेढीचे अध्यक्ष अविनाश भोसले यांना प्रदान करण्यात आला. मराठा समाज गौरव हा पुरस्कार मुख्य अधिकारी नगरपरिषद संपतराव शिंदे यांना देण्यात आला. यावेळी खासदार राजन विचारे, महापौर संजय मोरे, सभागृहनेते नरेश म्हस्के, विरोधीपक्ष नेते हनुमंत जगदाळे, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी व आमदार निरंजन डावखरे यांसह मान्यवर उपस्थित होते. दुसरीकडे शहर काँग्रेसच्या वतीने कोपरी, मनोरमानगर, उथळसर नाका, करवालोनगर, वर्तकनगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. (टीम लोकमत)४शिरोशी : मुरबाड तालुक्यातील सरळगाव, धसई, टोकावडे, या बाजार पेठामध्ये नाक्यावर मंडप बांधून त्यामध्ये महाराजांचा पुतळा ठेवून अभिवादन करण्यात आले़ ४ढोल, ताशाच्या गजरात अन मशाली पेटवून पालखी काढून आगळावेगळा शिवजन्मोस्तव साजरा करण्यात आला.४लहान मुली तसेच महिला व पुरूषांनी पांरपरिक वेषभूषा करून मिरवणुकीत सामिल झाले. धसई, सरळगाव येथे लहान मुलांचे स्रेहसंमेलनाचा कार्यक्र म ठेवण्यात आला होता. 1महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तारखेनुसार शिवजयंती तारखेनुसारची शिवजयंती तलासरीतील शासकीय कार्यालयात व शाळात उत्साहाने साजरी करण्यात आली.2तलासरीतील नागरीकांच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. यामध्ये शालेय विद्यार्थीबरोबर नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थित राहून मिरवणुक गावातून काढण्यात यायची परंतु या वर्षी राजकारण्याच्या साठमारीत तारखेनुसारच्या शिवजयंती साजरी करण्यात न आल्याने तलासरीतील नागरीकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 3महाराष्ट्राच्या या आराध्य दैवतेची जयंती रोज जरी साजरी केली तरी जनतेला आनंदच पण राजकारण्याच्या साठमारीत आजची सार्वजनिक शिवजयंती तलासरीत साजरी करण्यात आली नाही.कोळसेवाडीत सर्वपक्षीय समितीतर्फे शिवजयंतीची भव्य मिरवणूककोळसेवाडी : कल्याण (पूर्व) सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती आयोजित भव्य मिरवणुकीला जिजाऊ नगरी, दादासाहेब गायकवाड क्रीडांगणातून ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथकांच्या तालावर प्रारंभ झाला.कल्याण (पूर्व) चे दोन आ.जगन्नाथ शिंदे व गणपत गायकवाड तसेच पोलीस आयुकत संजय जाधव, सहा. पोलीस आयुक्त चंद्रकांत थोरात, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष डौले, पोलीस निरीक्षक बी.जी. रोहम (गुन्हे अन्वेषण) यांच्या प्रमुख हस्ते मूर्तीकार विलास उतेकर प्रणित चित्ररथातील शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.मिरवणुकीच्या पूर्वी वहिनी कला मंचच्या प्रतिभा तांडेल दिग्दर्शित शिवजन्मोत्सव नृत्य नाटीका साभिनय सादर करण्यात आली. १२ जणींचा सहभाग असलेलो २५ मिनिटांच्या कार्यक्रमानंतर शिवआरती सादर करण्यात आली. कल्याण शहरातील श्रीमंत छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने पालखीसह शिवनेरी गडावर जाऊन ज्योत प्रज्वलित करून ८० ते ९० कार्यकर्त्यांच्या परतलेल्या पथकाने छत्रपती शिवराय प्रतिमेस जयघोषात मानवंदना दिली. पथकातील कार्यकर्त्यांचा समितीच्या वतीने स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. अध्यक्ष मयुरेश धुमाळ, उपाध्यक्ष तेजस भगत व सचिव प्रशांत शेलार हे सहभागी होते.प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही समितीच्या वतीने एका ज्येष्ठ कबड्डीपटूला निल्या हरी डे ना शिव कल्याण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मिरवणुकीचे महत्वाचे आकर्षण होते सचिव रुपेश गायकवाड संचलित बासरीवाला श्री गणेश तरुण मित्र मंडळाचा युवक -युवतींचे ढोल ताशा पथक. जिजाऊ नगरीत रुपेश गायकवाडने केलेले शिवराय पराक्रमाचे गायन प्रभावी ठरले. शिवप्रतिमेच्या चित्ररथापुढे पारंपारिक वेषातील अश्वारुढ महिला व मावळ्यांची लक्षणीय उपस्थिती मातोश्री विद्यालय, द्वारका विद्यालय विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, मार्शल आर्ट संचलित वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ, गायत्री प्राथमिक विद्यालयाचे लेझीम पथक, अविष्कार गु्रप संचलित शिवकालीन पांरपारिक वेषातील मावळे, शेकडो भगवे फेटेधारी समितीचे महिला-पुरूष पदाधिकाऱ्यांच्या, मान्यवरांच्या सहभागाने मिरवणुकीला शोभा आली होती. एकता मित्र मंडळ, शिव आज्ञा प्रतिष्ठान वगैरेंचे चित्ररथ सहभागी होते. मिरवणुकीच्या मार्गावर पुष्पवृष्टी झाली. अनेक चित्ररथ सहभागी झाले. समितीचे अध्यक्ष मनोज रॉय, आजी माजी पदाधिकारी, विश्वस्त नरेंद्र सूर्यवंशी, वसंतराव सूर्यवंशी, सोपानराव निचळ, सभापती शांताराम पवार, नगरसेवक नरेंद्र गुप्ते, उदय रसाळ, सचिन पोटे, रितेश खराटे, विजय मिश्रा, सुभाष म्हस्के, शाम शेळके, राजेश गरिबे, दत्ता गायकवाड, संजय गायकवाड, अमित सोनावणे, उर्मिला पवार, कुसुम गेडाम, वंदना मोरे, अनिल घुमरे, के.एल. वासनकर, संदीप तांबे इत्यादी सहभागी होते.