लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली असतानाच पुढच्या ४ ते ५ दिवसांत हवामानात तीव्र बदल होतील आणि राज्यात ठिकठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडेल. तर काही ठिकाणी गारपीट होईल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.
सोमवारी मध्यरात्री मुंबईतही ठिकठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली, तर मंगळवारी दिवसभर मुंबईकरांना उन्हाचे चटके बसले.
१५ मार्च : मुंबईसह कोकणात विजांचा कडकडाट होईल. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत पावसाची शक्यता.१६ मार्च : पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता.१७ मार्च : कोकणात विजांचा कडकडाट होईल. शिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही विजांचा कडकडाट होईल. १८ मार्च : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होईल.
कुठे गारपिटीची शक्यता?
- १६ ते १७ मार्च : गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ - १५ ते १६ मार्च : उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड- १४ ते १६ मार्च : नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"