हज कमिटीला १५ हजार जागांचा जादा कोटा, महाराष्ट्राला सर्वाधिक २३८७ सीट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 05:32 PM2019-05-02T17:32:00+5:302019-05-02T17:32:25+5:30

यावर्षी हज यात्रेसाठी जाण्यास इच्छुक असूनही हज कमिटी आॅफ इंडियाच्यावतीने काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये नंबर न लागलेल्या नागरिकांसाठी एक खुशखबर आहे.

 Haj Committee has got more than 15 thousand seats in excess quota, Maharashtra tops 2387 seats | हज कमिटीला १५ हजार जागांचा जादा कोटा, महाराष्ट्राला सर्वाधिक २३८७ सीट

हज कमिटीला १५ हजार जागांचा जादा कोटा, महाराष्ट्राला सर्वाधिक २३८७ सीट

Next

- जमीर काझी 
मुंबई  - यावर्षी हज यात्रेसाठी जाण्यास इच्छुक असूनही हज कमिटी आॅफ इंडियाच्यावतीने काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये नंबर न लागलेल्या नागरिकांसाठी एक खुशखबर आहे. हज समितीचा कोटा तब्बल १४ हजार ९७५ जागा वाढविण्यात आला आहे. अतिरिक्त सीटमध्ये सर्वाधिक २३८७ सीट महाराष्ट्राच्या वाट्याला आल्या आहेत. सौदी अरेबिया सरकारशी झालेल्या करारानुसार सौदी दुतावासाकडून ही वाढ करण्यात आली आहे.

प्रतिक्षा यादीवर प्राधान्य क्रमांकानुसार अर्जदारांची त्यासाठी निवड करण्यात आली असून संबंधितांनी ९ मेपर्यत सर्व कागदपत्रे सादर करावयाची आहेत. वाढलेल्या जागामुळे यावर्षी हज कमिटीच्या मार्फत एकुण १ लाख ४० हजार यात्रेकरुंना हजला जाता येणार आहे.
इस्लाम धर्मातील प्रमुख पाच तत्वापैकी हज यात्रा ही एक असून दरवर्र्षी सौदी अरेबियांयात भरत असते. त्यासाठी जगभरातील मुस्लिम बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी होत असतात. भारतातील यात्रेकरुसाठी केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्रालयाकडून नियोजन करण्यात येते. भारतासाठी सरासरी १ लाख ६० हजार यात्रेकरुना पाठविले जाते. त्यामध्ये जवळपास ५० हजार सीट खासगी ट्रर्स कंपनीला देण्यात आले असून उर्वरित यात्रेकरु च्या यात्रेचे नियोजन हज कमिटी आॅफ इंडियाच्या मार्फत केले जाते.

यावर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या यात्रेसाठी हज कमिटीसाठी सुरवातीला १ लाख २५ हजार जागाची देशभरातील विविध राज्यातून आलेल्या अर्जातून संगणकीय सोडत काढून निश्चित करण्यात आले आहेत. त्याशिवाय हज कमिटीने आणखी कोटा वाढवून देण्याबाबत मंत्रालयच्या मार्फत जानेवारीमध्ये मागणी केली होती. सौदी अरेबियाच्या जेदाद्द दुतावासाने १८ एप्रिलला १४ हजार ९७५ अतिरिक्त कोटा बहाल केला आहे.

अतिरिक्त कोट्याचे विविध १४ राज्यातील इच्छुकांच्या प्रमाणानुसार वाटप करण्यात आले असून त्यामध्ये महाराष्टÑातील रहिवास्यांना सर्वाधिक २३८७ सीट देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रतिक्षा यादीवर असलेल्या ७२१ ते ३१०४ क्रमांकावर असलेल्यांना हजला जाण्याची संधी मिळाली आहे. संबंधितांनी पासपोर्टसह वैद्यकीय प्रमाणपत्रे व अन्य आवश्यक कागदपत्रांची पूर्तता ९ मे पर्यत केल्यानंतर त्यांचा हज प्रवास निश्चित होईल.
 
अतिरिक्त कोट्यातील राज्यनिहाय जागा
अतिरिक्त कोट्यातील महाराष्टÑ (२३८७)व्यतिरिक्त अन्य प्रमुख रज्यांना देण्यात आलेल्या जागा अशा:, उत्तर प्रदेश (२१५४), केरला (१६३२)जम्मू कश्मीर (१५७६), कर्नाटक (१४५२), राजस्थान (११४३), गुजरात (१०७५), मध्यप्रदेशन (८७८), तेलगणा( ८२१)
 
सौदी दुतावासाशी झालेल्या पत्रव्यवहारानुसार हज कमिटीला १४,९७५ अतिरिक्त कोटा मिळाला आहे. त्याचे राज्यनिहाय प्रतिक्षा यादीवरील इच्छुकांना संधी देण्यात आलेली असून पात्र ठरलेल्यांनी वेळेत कागदपत्रे व रक्कमेची पूर्तता केल्यानंतर त्यांचा प्रवास निश्चित समजला जाईल.
डॉ. एम. ए.खान (मुख्य कार्यकारी अधिकारी, हज कमिटी आॅफ इंडिया)

Web Title:  Haj Committee has got more than 15 thousand seats in excess quota, Maharashtra tops 2387 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.