मुंबईकरांसाठी ‘हालदिन’; वीज गायब, लोकलचाही ‘ओव्हरहेडेक’

By admin | Published: September 3, 2014 03:32 AM2014-09-03T03:32:05+5:302014-09-03T03:32:05+5:30

ट्रॉम्बे येथील 500 मेगावॅट क्षमतेच्या 5 क्रमांकाच्या युनिटमध्ये सकाळी पावणोदहा वाजता तांत्रिक बिघाड झाला.

'Haldin' for Mumbaikars; Electricity disappeared, local 'overhead' | मुंबईकरांसाठी ‘हालदिन’; वीज गायब, लोकलचाही ‘ओव्हरहेडेक’

मुंबईकरांसाठी ‘हालदिन’; वीज गायब, लोकलचाही ‘ओव्हरहेडेक’

Next
ऐन उत्सवात विघ्न : रात्री उशिरार्पयत भारनियमन, व्यवहार ठप्प, घाटकोपर ते विक्रोळीदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली
मुंबई : ट्रॉम्बे येथील 500 मेगावॅट क्षमतेच्या 5 क्रमांकाच्या युनिटमध्ये सकाळी पावणोदहा वाजता तांत्रिक बिघाड झाला. यामुळे शिवडी, महालक्ष्मी, वरळी आणि दादर अशा विविध भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे परळ येथील केईएम रुग्णालय आणि इतर रुग्णालयांतील वीज काही वेळासाठी बंद झाली होती. रुग्णालयातील कामकाजावर परिणाम होऊ नये, म्हणून बेस्ट अधिका:यांनी वेळीच येथील वीजपुरवठा सुरळीत केला. 
सेंटरमधील बिघाडामुळे चेंबूर, सांताक्रूझ, घाटकोपर, वांद्रे, कुर्ला, टिळकनगर, विक्रोळी, साकीनाका, जुहू या भागात एक ते दीड तासाचे टप्प्याटप्प्याने भारनियमन करण्यात आले. एकाच भागात वीजपुरवठा करण्यावर ताण येऊ नये, यासाठी टप्प्याटप्प्याने भारनियमन करण्यात येत असल्याचे टाटा पॉवरकडून सांगण्यात आले.
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मुंबईकरांच्या कामांचा खोळंबा झाला. दक्षिण मुंबईतील विविध भागांत टप्प्याटप्प्याने भारनियमन करण्यात आल्याने कार्यालयीन कामकाजांवर याचा परिणाम झाला. रात्री उशिरार्पयत बेस्टला सुमारे 100 मेगावॅट विजेची कमतरता भासत होती. यामुळे मुंबईमध्ये रात्री उशिरार्पयत भारनियमन सुरूच होते.
जनरेटिंग सेंटरमध्ये बिघाड झाल्याचा फटका उपनगरांनाही बसला. उपनगरांत वीजपुरवठा करणा:या रिलायन्स एनर्जीलाही उपनगरांत भारनियमन करणो भाग पडले.
तांत्रिक कारणांमुळे ट्रॉम्बे येथील 5 क्रमांकाचे जनरेटिंग सेंटर बंद पडले. रात्री उशिरार्पयत या सेंटरच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. टाटा पॉवर कंपनीने येथील 6 व्या क्रमांकाचे ऑइलवरील युनिट कार्यान्वित केले. मात्र राज्यातून पर्यायी विजेची व्यवस्था होऊ न शकल्याने मुंबईतील विविध भागांमध्ये भारनियमन सुरू राहिले. रात्री उशिरार्पयत वीजपुरवठा सुरळीत सुरू होईल, असे टाटा पॉवरकडून सांगण्यात आले. 
‘मरे’ चार तास ठप्प 
घाटकोपर ते विक्रोळीदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी सव्वासातच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटली. या घटनेमुळे चाकरमान्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील सेवा माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात आल्या आणि त्यानंतर लोकलचा बो:या वाजण्यास सुरुवात झाली. जलद मार्गावरील दोन मार्गावरच फक्त लोकल सेवा सुरू ठेवण्यात आल्याने लोकल तब्बल अर्धा तासांपेक्षा जास्त उशिराने धावू  लागल्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. बदलापूर, अंबरनाथसह कल्याण, डोंबिवली, ठाणो ते भायखळा स्थानकांवर तुडुंब गर्दी झाली. सर्वच स्थानकांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम सव्वाअकराच्या सुमारास पूर्ण करण्यात आले आणि त्यानंतर लोकल पूर्ववत झाल्या. परंतु दुपार्पयत लोकल सेवेचा गोंधळ सुरूच होता. या घटनेमुळे 69 लोकल रद्द करण्यात आल्या. या गोंधळानंतर बेस्टने ज्यादा बसेस सोडल्या. त्यामुळे प्रवाशांना मोठा आधार मिळाला, तर रिक्षा-टॅक्सी चालकांची चांगलीच कमाई झाली. 
शहारात अनेक भागात मंगळवारी अचानक लाईट गायब झाल्याने मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोर जावे लागले. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चेंबूर परिसरात लाईट गेली होती. त्यामुळे या परिसरातील वाहतूक सिग्नल यंत्रणा पूर्णपणो ठप्प झाली होती. परिणामी चेंबूर कॅम्प, चेंबूर नाका सिग्नल आदी ठिकाणी वाहतूक पूर्णपणो ठप्प झाली होती. अखेर वाहतूक पोलिसांनी या परिसरात जाऊन वाहतूक सुरळीत केली. त्यातच अनेक कंपन्यांचे मोबाईल टॉवर देखील लाईट नसल्याने बंद पडल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. गणोश मंडळांचे लाऊड स्पीकरही पूर्णपणो बंद झाले होते. 
अखेर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा सर्व विद्युत सेवा सुरळीत झाली. मात्र, 5 वाजता पुन्हा लाईट गेल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात होता. (प्रतिनिधी)
 
गणपतीची धामधूम, गौराईच्या स्वागताची तयारी असा उत्साही दिवस मुंबईकरांसाठी ‘हालदिन’ ठरला. टाटा पॉवर कंपनीच्या ट्रॉम्बे येथील जनरेटिंग सेंटरमध्ये तांत्रिक बिघाडाने सकाळपासून अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला होता. तर दुसरीकडे सकाळी साडेसातच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे ठप्प झाली होती. वीज गायब झाल्याने व्यवहार थंडावले होते तर दुसरीकडे लोकल ठप्प झाल्याने चाकरमानी चार तास लटकले होते. 

 

Web Title: 'Haldin' for Mumbaikars; Electricity disappeared, local 'overhead'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.