मुंबई : हल्दीरामची उत्पादने खाण्याजोगी असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे. हल्दीरामच्या उत्पादनांमध्ये दोष असल्याचा आरोप झाला होता. त्यानुसार प्रशासनाने या उत्पादनांची चाचणी केली. त्यात काही दोष आढळला नाही. यात वापरले जाणाऱ्या वस्तू व त्याचे प्रमाण कोठेही नियमबाह्य नाही, असे प्रशासनाच्या चाचणीतून निष्पन्न झाले आहे. तरीही पुढे पुन्हा एकदा याची चाचणी केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. हल्दीरामच्या प्रॉडक्ट्सचे २० नमुने एफडीएने चाचणीसाठी घेतले होते. पैकी १४ नागपूरमधून तर ६ मुंबईतून घेण्यात आले. यात वाळूचे कण आहेत का? तसेच शिस्याचे प्रमाण अधिक आहे का? याची तपासणी करण्यात आली.पण त्यात नियमबाह्य काहीही आढळले नसल्याचे एफडीएकडून स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)
हल्दीरामची उत्पादने खाण्याजोगी
By admin | Published: August 04, 2015 1:31 AM