- शेफाली परब।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सरकारी व खाजगी कार्यालयांचे मुख्यालय, मंत्री व बड्या उद्योगपतींचे निवासस्थान व टोलेजंग इमारतींमुळे सर्वांचे लक्ष असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघात वकील, डॉक्टर, व्यावसाय व्यवस्थापनात पदवीधर असे उच्चशिक्षित तसेच पदवीधर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले काही हौशे-गवशे अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावणार आहेत. परंतु प्रमुख राजकीय पक्षांनी या मतदारसंघात उच्चशिक्षित उमेदवार उभे करणे हीच जमेची बाजू आहे.
उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर दक्षिण मुंबईत दोन अर्ज बाद झाले. त्यामुळे आता १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील पाहता दोन वकील, मुंबईतील हृदयरोग तज्ज्ञ आणि व्यवसाय व्यवस्थापनात पदवीधर अशा उच्चशिक्षितांचा यात समावेश आहे. तर तीन उमेदवार पदवीधर आहेत. दोन उमेदवारांनी १२वीपर्यंत शिक्षण घेतले आहे. चार उमेदवार दहावी तर एक उमेदवार नववी उत्तीर्ण झालेला आहे.
प्रमुख पक्षांकडून उच्चशिक्षितांना प्राधान्यदक्षिण मुंबई मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजप युती अशी थेट लढत आहे. या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी बोस्टन महाविद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापनात पदवी मिळवली आहे. तर शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत विज्ञान शाखेचे पदवीधर आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अनिल कुमार चौधरी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.अपक्षांची फळी कमकुवतबदल घडविण्यासाठी उच्चशिक्षित उमेदवारांनी राजकारणात येण्याचे आवाहन अनेकवेळा केले जाते. मात्र विकासाचा मुद्दा घेऊन पुढे आलेले अपक्ष उमेदवार पदवीधरही नसल्याचे दिसून येत आहे. दक्षिण मुंबईतून छोट्या-मोठ्या पक्षांच्या झेंड्याखाली अथवा स्वबळावर निवडणूक लढविणारे अधिक आहेत. परंतु यापैकी निम्मे दहावी पास, एक नववी पास तर दोन उमेदवारांचे शिक्षण १२ वीपर्यंत झाले आहे. त्यामुळे या अपक्ष उमेदवारांची फळी कमकुवतच ठरणार आहे.मतदार देतात का राजकीय नेत्याच्या शिक्षणावर भर?सुशिक्षितानेच प्रतिनिधित्व करावेही लोकसभेची निवडणूक असल्याने उमेदवारही तेवढ्याच तोडीचा असणे अपेक्षित आहे. मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारा खासदार दहावी आणि बारावी पास कसा चालेल? तो उच्चशिक्षित असेल तरच आमचा आवाज देशपातळीवर पोहोचवू शकेल. - शुभदा सावंत (गृहिणी)समस्या सोडविण्यासाठी शिक्षण हवेचराजकारणात प्रवेश देण्यासाठी काही निकष ठरणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांनीही आपले हितसंबंध बाजूला ठेवून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उच्चशिक्षित उमेदवारांनाच प्राधान्य देण्याची गरज आहे. सुशिक्षित उमेदवारच आमच्या समस्या सोडवू शकेल. - अनघा मयेकर (नोकरी)कला विषयांतील सर्वाधिक पदवीधरशासकीय कार्यालयांमध्ये चतुर्थी श्रेणी ते अधिकारीवर्गापर्यंत नियुक्ती करताना शैक्षणिक योग्यता तपासली जाते. मग देशाच्या भविष्यासाठी निवडण्यात येणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक योग्यता का तपासू नये? देशाची सुरक्षा आणि विकासाचा प्रश्न आहे. - कुमार विशाल (व्यवसाय)