Join us

मेट्रो-३ साठी अर्धी मुंबई पोखरली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 1:49 AM

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ३३ किलोमीटर भुयारी मेट्रो मार्गाचे काम दिवसागणिक गती पकडत असून, आतापर्यंत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने स्टील, काँक्रिट आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने बऱ्यापैकी कामाचा आवाका घेतला केला आहे.

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ३३ किलोमीटर भुयारी मेट्रो मार्गाचे काम दिवसागणिक गती पकडत असून, आतापर्यंत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने स्टील, काँक्रिट आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने बऱ्यापैकी कामाचा आवाका घेतला केला आहे. विशेषत: न्यू आॅस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने मेट्रोच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न कॉर्पोरेशनकडून केला गेला आहे़ पावसाळ्यात मेट्रोच्या कामामुळे मुंबईकरांना अडचण येणार नाही; याची खबरदारी घेणार असल्याचेही कॉर्पोरेशनने म्हटले असून, महापालिकेसोबत बैठका घेत, पावसाळी कामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मेट्रोचे काम अधिक जलदगतीने होण्याची शक्यता आहे़मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो-३ च्या फोर्ट येथील स्थानकाच्या बेस स्लॅबचे ६३ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. या कामासाठी ९० मेट्रिक टन स्टील व ५०२ घनमीटर काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. सहार रोड मेट्रो स्थानकाच्या दुसºया विस्तारीत कॉनकोर्स स्लॅबचे ३२ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. १६५ मेट्रिक टन स्टील व १ हजार ७० घनमीटर काँक्रीटचा वापर करत ताशी ६३ घनमीटर वेगाने हे काम पूर्ण करण्यात आले. एमआयडीसी मेट्रो स्थानकाचे बेस स्लॅबचे काम १०० टक्के पूर्ण करण्यात आले. एकूण ३०९ वर्गमीटरच्या या बेस स्लॅबसाठी ८३ मेट्रिक टन स्टील व ५५२ घनमीटर इतक्या काँक्रीटचा वापर करण्यात आला.विधानभवन मेट्रो स्टेशनमध्ये १३ व्या भुयारीकरणाचा टप्पा पार पडला असून, ९५ मीटरच्या लांबीचे सूर्या २ हे टीबीएम मशिन रॉबिन्स कंपनीच्या बनावटीचे असून, याचे वजन ६०० मेट्रिक टन आहे. ८३८ रिंग्सचा वापर करत प्रतिदिन ७ रिंग्स या गतीने १.२४ किमीचे भुयार पूर्ण करण्यात आले. सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाच्या पहिल्या रुफ स्लॅबचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ३५७ चौरस मीटरचे हे काम ६८ मॅट्रिक टन इतके स्टील वापरून ताशी २६ घनमीटर च्या वेगाने पूर्ण करण्यात आले. मेट्रो स्थानक इमारतीच्या रुफ स्लॅबचे काम पूर्ण होणारे सिद्धिविनायक हे पहिले स्थानक आहे. बिकेसी मेट्रो स्थानकाच्या विस्तारित बेस स्लॅबच्या ७व्या काँक्रीटभरणीचे काम पूर्ण करण्यात आले. ८४५ चौरस मीटर क्षेत्रात ३०३ मॅट्रिक टन इतके स्टील व १,२१० घनमीटर इतक्या काँक्रीटचा वापर करत ताशी ५९ घनमीटरच्या वेगाने ३१.६ टक्के काम पूर्ण करण्यात आले. टीबीएम गोदावरी ४ ने बिकेसी स्थानकापासून भुयारीकरणाला सुरुवात करत, प्रतिदिन ५ मीटरच्या गतीने तब्बल ८८९ मीटरचे हे भुयार १७६ दिवसात रोजी पूर्ण झाले.>असे करण्यात आले कामविधानभवन मेट्रो स्थानकावर भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण होत असतानाच, ९५ मीटर लांब सूर्या १ टीबीएमद्वारे अप मार्गावर कफ परेड ते विधानभवनदरम्यानचे १.२ किमी लांब असे भुयार खणण्यात आले.सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन बॉक्समधील सातव्या बेस स्लॅबच्या काँक्रीट भरणीचे काम पूर्ण झाले आहे. १३० मेट्रिक टन इतके स्टील, ६१९ घन मीटर इतके काँक्रीट सिमेंटचा वापर करत हे काम ताशी २५ घन मीटर या वेगाने पूर्ण झाले.वैनगंगा ३ टीबीएमद्वारे पाली मैदान ते सीएसआयए टी-२ दरम्यानचा भुयारीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. मरोळनाका मेट्रो स्टेशन बॉक्समधील १ लाख ७ हजार ६०० क्यूबिक मीटर मलबा खणण्याचे काम प्रतिदिन २५८ क्यूबिक मीटर या गतीने हे काम १०० टक्के पूर्ण करण्यात आले.गोदावरी-१ टीबीएमद्वारे विद्यानगरी ते आंतरदेशीय विमानतळ टी-१ पर्यंतचे २.९ किमीचे भुयारीकरण प्रतिदिन ६.५२ मीटर वेगाने ४५५ दिवसात पूर्ण करण्यात आले.

टॅग्स :मेट्रो