मुंबई : मालाड पश्चिमच्या लिंक रोडवर मीठ चौकी नाका ब्रीज बांधण्यात येत आहे. मार्वे रोडवरून जवळपास झोपडपट्टी परिसरात राहणारे दीड ते दोन लाख लोक याच मार्गावरून प्रवास करतात. २००४ मध्ये पालिकेने या पुलाचे काम हाती घेतले होते, जे मार्च २०२४ मध्ये पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
मात्र त्यामुळे शाळकरी मुलांसह दुचाकी, चारचाकी, डेब्रिजच्या गाड्या, वॉटर टँकर, छोटे टेम्पो, रिक्षा यांच्यामुळे मार्वे रोडवर जीवघेणी वाहतूक कोंडी निर्माण होते. एखादी दुर्घटना झाल्यास मदतीसाठी वेळेत पोहोचणे अग्निशमन दल तसेच रुग्णवाहिकेला शक्य नाही. बऱ्याचदा वेळेत रुग्णालयात पोहोचू न शकल्याने स्थानिकांनी जीव गमावला आहे.
मीठ चौकी सिग्नलची दहशत!रिक्षा, टॅक्सीने प्रवास करताना दुप्पट-तिप्पट भाडे भरावे लागते. सकाळी लवकर निघालो, तरी तास दोन तास प्रवासात जातात. निमुळता रस्ता त्यात मीठ चौकीला १०-१० मिनिटे सिग्नल लागतो पडतो. ज्याने प्रवास नकोसा झाला.- युवराज सिंग, नोकरदार