मानधनाची अर्धी चिंता मिटली; होमगार्डना दिलासा; मिळणार सलग १८० दिवस काम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 09:06 AM2023-07-29T09:06:20+5:302023-07-29T09:06:43+5:30
महाराष्ट्र गृहरक्षक दलातील जवानांनी ३६५ दिवस नियमित करण्याबाबत पावसाळी अधिवेशनावेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
मुंबई : गृहरक्षक दलातील जवानांना (होमगार्डना) पुन्हा सलग १८० दिवस काम मिळणार आहे. याबरोबरच त्यांना कवायत भत्ता देण्याचा, तसेच दर ३ वर्षांनी नोंदणी करण्याचा नियम रद्द करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना केली.
महाराष्ट्र गृहरक्षक दलातील जवानांनी ३६५ दिवस नियमित करण्याबाबत पावसाळी अधिवेशनावेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. गृहरक्षक दलाच्या विविध १७ मागण्यांसंदर्भात महादेव जानकर यांनी लक्षवेधी मांडली होती.
राज्यांवरील आपत्ती, बंदोबस्तावेळी या जवानांचा मोठा आधार लाभतो. त्यामुळे पुन्हा यासाठी ३५० कोटींची तरतूद करण्यात आली असून, त्यांना सलग १८० दिवस काम मिळणार आहे.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री