हाफकिनचे एमडी तीन दिवसांत बदलले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 03:36 AM2020-08-21T03:36:21+5:302020-08-21T03:36:24+5:30

ए. शैला या आता नव्या व्यवस्थापकीय संचालक असतील. त्यांच्यासह चार सनदी अधिकाऱ्यांची गुरुवारी बदली करण्यात आली.

Halfkin's MD changed in three days | हाफकिनचे एमडी तीन दिवसांत बदलले

हाफकिनचे एमडी तीन दिवसांत बदलले

Next

मुंबई : हाफकिन इन्स्टिट्यूट; मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक तीन दिवसांतच बदलण्यात आले आहेत. ए. शैला या आता नव्या व्यवस्थापकीय संचालक असतील. त्यांच्यासह चार सनदी अधिकाऱ्यांची गुरुवारी बदली करण्यात आली.
हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक राजेश देशमुख यांची १७ आॅगस्टला पुणे जिल्हाधिकारीपदी बदली केली आणि चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना देशमुख यांच्या जागी नियुक्त केले.मात्र, गुरुवारी खेमनार यांच्या जागी ए. शैला यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला. खेमनार यांची बदली पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली. उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे सदस्य सचिव व्ही. बी. पाटील यांची बदली अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव म्हणून झाली. आधीचे सचिव संजय खंडारे यांची महाजेनकोच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाल्यापासून हे पद रिक्त होते. भूजल सर्वेक्षण; पुणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांची उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Halfkin's MD changed in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.