हाफकिनच्या सुधारणांचा आराखडा नव्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:24 AM2020-12-11T04:24:04+5:302020-12-11T04:24:04+5:30
मुंबई : हाफकिन इन्स्टिट्यूट येथील इमारतीचे काम करीत असताना या इमारतीचे हेरिटेज महत्त्व लक्षात घेऊन बांधकाम करणे आवश्यक आहे. ...
मुंबई : हाफकिन इन्स्टिट्यूट येथील इमारतीचे काम करीत असताना या इमारतीचे हेरिटेज महत्त्व लक्षात घेऊन बांधकाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत पुढील काम करीत असताना याबाबतचा एकत्रित आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी सांगितले.
हाफकिन इन्स्टिट्यूटच्या कामांबाबतचा आढावा घेण्याबाबत मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस हाफकिन इन्स्टिट्यूटच्या संचालक सीमा व्यास यांच्यासह वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह हाफकिन इन्स्टिट्यूटचे संचालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
हाफकिन इन्स्टिट्यूट येथे काम करीत असताना बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या निधीबाबत सुधारीत पुरवणी मागणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सुधारीत प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना देशमुख यांनी केल्या. तसेच बांधकाम करण्यापूर्वी स्वत: हाफकिन इन्स्टिट्यूट येथे भेट देऊन पाहणी करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी एकत्रित आराखडा हाफकिन इन्स्टिट्यूटने तयार करून वैद्यकीय शिक्षण विभागास सादर करावा, असे निर्देशही देशमुख यांनी दिले.