Join us

हॉलमार्क सेंटर चालकांचा संप, बनावट मार्किंगविरोधात कारवाईची मागणी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 2:44 AM

राज्यात सुरू असलेल्या बनावट मार्किंगविरोधात इंडियन असोसिएशन आॅफ हॉलमार्किंग सेंटर्स संघटनेने ६ ते ८ आॅगस्टदरम्यान तीन दिवस संप पुकारला होता.

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या बनावट मार्किंगविरोधात इंडियन असोसिएशन आॅफ हॉलमार्किंग सेंटर्स संघटनेने ६ ते ८ आॅगस्टदरम्यान तीन दिवस संप पुकारला होता. मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संघटनेचे खजिनदार बसंतराज मेहता यांनी संपाच्या सांगतेची घोषणा केली, तसेच ज्वेलर्सने मोठ्या संख्येने भारतीय मानक ब्युरोकडे (बीआयएस) नोंदणी करण्याचे आवाहन ज्वेलर्स संघटनेचे नेते राजाराम देशमुख यांनी केले.देशमुख यांनी सांगितले की, देशातील ८० टक्के ज्वेलर्सनी अद्याप बीआयएसकडे नोंदणी केलेली नाही. त्याचाच फायदा बनावट मार्किंग करणारे सेंटर घेत आहेत. हॉलमार्किंगमुळे ग्राहकांना शुद्ध सोन्याचे दागिने मिळतात. दागिन्यांना हॉलमार्किंग करणारे राज्यात १०६ सेंटर्स आहेत. मात्र, काही बनावट मार्किंग करणाऱ्या सेंटरमध्ये अशुद्ध दागिन्यांवर मार्किंग केले जात आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे. यसाठी शासनाने कडक कायदा करण्याची गरज आहे. त्यासाठी ज्वेलर्सनेही मोठ्या संख्येने बीआयएसकडे नोंदणी करण्याचे आवाहन देशमुख यांनी केले.बसंतराज मेहता म्हणाले की, २००० साली तयार केलेला हॉलमार्किंग कायदा गेल्या वर्षी लोकसभेसह राज्यसभेत मंजूर झाला. मात्र, राजपत्र नसल्याने त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झालेली नाही. सरकारने तत्काळ कायद्याची अंमलबजावणी केल्यास बनावट सेंटरला चाप बसेल. शासनाने नियोजनबद्धपणे सेंटरसाठी परवानगी द्यावी, तसेच बनावट मार्किंग करणाºया सेंटर्सवर कारवाई करण्याची मागणी संघटनेतर्फे मेहता यांनी केली.