‘झाला अनंत हनुमंत’ नाटकाचे माध्यमांतर..!

By admin | Published: June 29, 2017 03:06 AM2017-06-29T03:06:50+5:302017-06-29T03:06:50+5:30

साचेबद्ध चौकटीपलीकडे जात पारंपरिकतेला धक्का देणाऱ्या नाट्यबीजाची केलेली पेरणी आणि त्याचबरोबर स्फोटक विषय हे नाटककार

'Halted Anant Hanumant' play! | ‘झाला अनंत हनुमंत’ नाटकाचे माध्यमांतर..!

‘झाला अनंत हनुमंत’ नाटकाचे माध्यमांतर..!

Next

राज चिंचणकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : साचेबद्ध चौकटीपलीकडे जात पारंपरिकतेला धक्का देणाऱ्या नाट्यबीजाची केलेली पेरणी आणि त्याचबरोबर स्फोटक विषय हे नाटककार विजय तेंडुलकर यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या विविध नाटकांनी रंगभूमीवर अढळ स्थान मिळवले आहे. मराठी रंगभूमीवर मोठा प्रभाव पडणाऱ्या त्यांच्या नाटकांत ‘झाला अनंत हनुमंत’ या नाटकाचेही नाव घेतले जाते. एक काळ रंगभूमी गाजवलेल्या याच नाटकाचे आता माध्यमांतर होत असून, तेंडुलकरांची ही संहिता मोठ्या पडद्यावर दृश्यमान होत आहे.
‘सखाराम बाइंडर’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘शांतता! कोर्ट चालू आहे’, ‘माणूस नावाचे बेट’, ‘एक हट्टी मुलगी’, ‘अशी पाखरे येती’, ‘गिधाडे’, ‘छिन्न’ अशा अनेक नाटकांतून विजय तेंडुलकर यांनी रूढ सामाजिक संकेतांना धक्का दिला. त्याची पडछाया ‘झाला अनंत हनुमंत’ या नाटकातही पडलेली दिसते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावरच्या चर्चांना अंत नसतो. याच विषयाला धरून तेंडुलकरांनी त्यांच्या खास अशा खोचक शैलीत या नाटकात प्रकाश टाकला आहे. तेंडुलकरांच्या प्रभावी लेखणीतून उतरलेल्या या संहितेचा सन्मान करण्यासाठी निर्माते गिरीश वानखेडे यांनी या माध्यमांतराचे पाऊल उचलले आहे. यात त्यांना रंगकर्मी नंदू माधव, मंगेश देसाई, शांता तांबे, सिया पाटील, पूजा पवार, सोनाक्षी मोरे यांनी साथ दिली आहे.

Web Title: 'Halted Anant Hanumant' play!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.