पंकज राऊत, बोईसरतारापूर एमआयडीसी रस्त्यालगत असलेल्या अवधनगर येथील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या तीन इमारतींचे बांधकाम महसूल विभागाने पाडले. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. येथील शेकडो अवैध बांधकामे महसूल खात्याच्या रडारवर असून ही बांधकामे कुणाच्या आशीर्वादाने झाली याचाही शोध घेणे गरजेचे आहे.दोन जेसीबीच्या सहाय्याने बांधकामे तोडण्यास सुरुवात झाली. यावेळी पालघरचे तहसीलदार चंद्रसेन पवार, बोईसरच्या मंडळ अधिकारी रेखा म्हात्रे, तारापूर मंडळ अधिकारी साबळे, मनिषा कांबळे, साधना चव्हाण, हितेश राऊत, संजय चुरी, साधना भालेराव, महेश कचरे, मनिष वर्तक, तलाठी, महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला.सरावली येथील सर्व्हे नंबर ९१ व ९२ या शासकीय जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आले. यासंदर्भात तहसीलदारांनी नोटीस बजावली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने प्रशासनाने शुक्रवारी ही कारवाई केली. यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, आणखी काही दिवस ही कारवाई करण्यात येणार आहे.
बोईसरमध्ये हातोडा
By admin | Published: April 24, 2015 11:17 PM