Join us

मालाडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 39 बांधकामांवर हातोडा

By मनोहर कुंभेजकर | Published: October 05, 2023 5:51 PM

विभागाच्या वतीने एकापाठोपाठ एक रस्ता रुंदीकरणाची कामे घेत आज 39 बांधकामांवर हातोडा मारला. 

मुंबई : पश्चिम उपनगरातील मालाड मधील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी/ उत्तर विभाग कार्यालयाने कंबर कसली आहे. विभागाच्या वतीने एकापाठोपाठ एक रस्ता रुंदीकरणाची कामे घेत आज 39 बांधकामांवर हातोडा मारला. 

पी/ उत्तर विभाग कार्यालयाने आज चिंचोली फाटक, दर्गाह मशिदी जवळील एस व्ही रोड रुंदीकरणात बाधित होत असलेली 24 , व उंदेराई जंक्शन वरील 15 अशी एकूण 39 बांधकामे हटवण्याची कार्यवाही पी/उत्तर विभाग कार्यालयामार्फत पार पाडण्यात आली. 

सदरची कार्यवाही उपायुक्त परिमंडळ 4चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी/ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त  किरण दिघावकर यांची रूपरेषा व आखणी नुसार सहाय्यक अभियंता मंदार चौधरी व सह-अभियंते यांनी प्रत्यक्षात अमलात आणली व  बाधित झालेली बांधकामे दोन जेसीबी सयंत्र , दहा कामगार आणि सात अभियंते मार्फत निष्कासित करण्यात आल्याची माहिती किरण दिघावकर यांनी दिली.

टॅग्स :मुंबई