मुंबई : केबल स्टेड पूल तयार करण्यासाठी रे रोड पूल, तसेच टिळक पूल तोडण्यात येणार आहे. रे रोड पूल १९१० साली बनविण्यात आला होता. दादरमधील टिळक रोड पूल १९२३ साली बनविण्यात आला होता. या पुलांनी अनेक घटना पाहिल्या आहेत. १९४२ च्या चलेजाव चळवळीपासून ते स्वातंत्र्य दिनाच्या दिवसापर्यंत, तसेच वानखेडे स्टेडियमवर जिंकलेल्या विश्वचषकापर्यंत अनेक घटनांचे साक्षीदार हे पूल आहेत. या दोन्ही पुलांवर हातोडा पडणार आहे.
हे दोन्ही पूल तोडून या जागेवर केबल स्टेड पूल उभारणार आहे. यासाठीची परवानगी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. एमआरआईडीसीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दादरच्या टिळक पुलाचे पुनर्निर्माण हे एमआरआयडीसीकडे सुपुर्त करण्यात आले आहे. महापालिका यासाठी आर्थिक मदत करणार आहे. रेल्वे सूत्रांच्या म्हणण्यानुसार नवीन पुलाची लांबी ३८५ मीटर असणार आहे. महारेल अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार महारेलने पुलाचे सौंदर्य टिकून राहण्याकरिता पुलावर एलईडी लाइटदेखील लावले जाणार आहे.