Join us

हागणदारीमुक्त योजनेत मुंबई शेवटून तिसरी, पुणे नंबर वन,  सोलापूर शेवटच्या क्रमांकावर

By अतुल कुलकर्णी | Published: October 01, 2017 1:36 AM

ओडीएफ (हागणदारीमुक्त) शहरांच्या यादीत पुणे महापालिकेने ५३,४२१ शौचालये बांधून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे, तर केवळ १,२३८ शौचालये बांधणारी मुंबई महापालिका शेवटून तिस-या क्रमांकावर आहे.

मुंबई : ओडीएफ (हागणदारीमुक्त) शहरांच्या यादीत पुणे महापालिकेने ५३,४२१ शौचालये बांधून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे, तर केवळ १,२३८ शौचालये बांधणारी मुंबई महापालिका शेवटून तिसºया क्रमांकावर आहे. रायगड जिल्ह्याने १२० टक्के उद्दिष्ट पूर्ण करून पहिला तर सोलापूर जिल्ह्याने ६७ टक्के काम करून शेवटचा क्रमांक मिळवला आहे.राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत रविवारी मुंबईत शहरी महाराष्टÑ ओडीएफ झाल्याचे घोषित करण्यात येणार आहे. त्याचवेळी ‘ओडी वॉच’ योजनेची घोषणा केली जाईल. नगरविकासच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ओडीएफअंतर्गत राज्यात ५ लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. हे काम ठेकेदाराकडून केले नाही. प्रत्येक व्यक्तीला एक शौचालय बांधण्यासाठी १७ हजार रुपये दिले गेले. ज्या पालिकांनी यात सक्रिय सहभाग घेतला, त्यांना प्रत्येकी १ ते २ कोटी रुपये विशेष अनुदान दिले जाणार आहे. कोणीही उघड्यावर शौचाला जाऊ नये यासाठी ‘ओडी वॉच’ पथक तयार केले जात असून, ते शहरात सकाळी गस्त घालेल. त्याची सुरुवात २ आॅक्टोबरपासून होईल. पथकांमध्ये पालिकांचे कर्मचारी, महिला बचत गटाच्या सदस्य व स्थानिक एनजीओ असतील. त्यांच्या अहवालांच्या आधारे पालिकांना किती अनुदान द्यायचे हे ठरेल. ज्या पालिका ‘ए’ ग्रेड मिळवतील त्यांना २ कोटी, ‘बी’ ग्रेडसाठी दीड व ‘सी’ ग्रेडसाठी १ कोटीचे अनुदान दिले जाईल. यात ‘ओडी वॉच’चे अहवाल कळीचे ठरतील.‘तशा’ जागांचा असाही वापर!भंडारा व वैजापूर नगरपालिकांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. दोन्ही शहरांत उघड्यावर जाणाºयांची संख्या मोठी होती. जिथे लोक जायचे, त्या जागांचे सौंदर्यीकरण केले आणि भंडाºयात तर योग केंद्र उभारले. तेथे आता हिरवेगार गवत दिसते. वैजापूर पालिकेने त्या जागेची सफाई करूनतेथे भाजीपाला व धान्याचा बाजार सुरू केला.टॉप पाच महापालिकानाव बांधलेली शौचालयेपुणे ५३,४२१सोलापूर १४,८६७अकोला १३,५९५अमरावती १२,४६५वसई-विरार १०,६१०बॉटम पाच महापालिकामीरा-भार्इंदर ९८८कल्याण-डोंबिवली १२३८मुंबई महापालिका १५०९भिवंडी निजामपूर १८१७कोल्हापूर १८६८टॉपपाच जिल्हेरायगड १२०%रत्नागिरी ११५ %सांगली १०७ %धुळे ८७ %नंदुरबार ८३ %बॉटम पाच जिल्हेसोलापूर ६७ %गडचिरोली ६९ %जालना ६९ %अकोला ७१ %जळगाव ७३ %

टॅग्स :मुंबई