हमसफर, अंत्योदय एक्स्प्रेसला हिरवा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 06:04 AM2017-08-14T06:04:53+5:302017-08-14T06:04:56+5:30

रेल्वे मंत्रालयाकडून चार अद्ययावत आणि आधुनिक एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती

Hamsafar, Green flag to Antyodaya Express | हमसफर, अंत्योदय एक्स्प्रेसला हिरवा झेंडा

हमसफर, अंत्योदय एक्स्प्रेसला हिरवा झेंडा

Next

मुंबई : रेल्वे मंत्रालयाकडून चार अद्ययावत आणि आधुनिक एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार अंत्योदय आणि हमसफर एक्स्प्रेसला रविवारी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तेजस एक्स्प्रेस दिमाखात सुरू आहे. तर उदय एक्स्प्रेस सज्ज असून लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. प्रभू यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हमसफर आणि अंत्योदय एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या वेळी प्रभू बोलत होते.
वांद्रे येथे झालेल्या कार्यक्रमात पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा,
मुंबई सेंट्रल विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकूल जैन हे उपस्थित होते. सुरेश प्रभू म्हणाले, भारतीय
रेल्वे स्थानकांवरील वाय-फाय
सेवा जगातील अन्य स्थानकांच्या तुलनेत जलद आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प- ३ अंतर्गत गेल्या तीन वर्षांत ५२ उपनगरीय लोकल वाढवण्यात आल्या आहेत. या वाढीव सेवांमुळे मुंबईकरांना फायदा झाला आहे.
पश्चिम रेल्वेवरील ट्रेन क्रमांक २२९१३/ २२९१४ वांद्रे टर्मिनस ते
पटना या मार्गावर ‘हसमफर एक्स्प्रेस’ आणि ट्रेन क्रमांक २२९२१/ २२९२२ वांद्रे टर्मिनस ते गोरखपूर या
मार्गावर ‘अंत्योदय एक्स्प्रेस’ धावणार आहे. हमसफर एक्स्प्रेसमध्ये जीपीएसवर आधारित पॅसेंजर इन्फॉर्मेशन डिस्प्ले यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याचबरोबर सीसीटीव्ही, अटेंडर, मोबाइल आणि लॅपटॉप चार्जिंगची सुविधा या एक्स्प्रेसमध्ये देण्यात आली आहे. अंत्योदय एक्स्प्रेस पूर्ण अनारक्षित असणार आहे. या एक्स्प्रेसमध्ये वॉटर प्युरिफायर, बायो टॉयलेट आणि अग्निशमन यंत्र अशी सुविधा देण्यात आलेली आहे.
>प्रवासी सोयीचे उद्घाटन
बोरीवली स्थानकावर २० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पाच लिफ्ट कार्यान्वित होत्या. स्थानकांवरील गर्दी लक्षात घेता फलाट क्रमांक १० नंबरवर आणखी एका लिफ्टचे लोकार्पण करण्यात आले आहे. या स्थानकासाठी १३ लिफ्ट प्रस्तावित आहेत. वसई रोड आणि विरार स्थानकांवर मोफत वायफाय सेवेचे लोकार्पण करण्यात आले आहे. या सर्व सोयींचे उद्घाटन प्रभू यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केले.
वांद्रे येथून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, खासदार गोपाळ शेट्टी आणि खासदार माजिद मेमन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे रविवारी हमसफर आणि अंत्योदय एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

Web Title: Hamsafar, Green flag to Antyodaya Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.