Join us

सुनेचा सासूवर चाकूहल्ला

By admin | Published: November 01, 2015 1:24 AM

सासू-सुनेची भांडणे तर समाजात पूर्वापार चालत आलेली. मग त्याला क्षुल्लक निमित्तही पुरसे ठरत असते. मात्र, या वादातून सुनेने चक्क सासूवर चाकूने वार करण्याची धक्कादायक

मुंबई : सासू-सुनेची भांडणे तर समाजात पूर्वापार चालत आलेली. मग त्याला क्षुल्लक निमित्तही पुरसे ठरत असते. मात्र, या वादातून सुनेने चक्क सासूवर चाकूने वार करण्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री चुनाभट्टी परिसरात घडली. या हल्ल्यात शीलादेवी यादव (वय ५५) जखमी झाल्या असून, त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा मुलगा इंद्रजीत व सून करिश्मा यादव यांना पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी सासू-सुनेत झालेला वाद विकोपाला गेला. त्या वेळेस घरी उपस्थित असलेल्या मुलगा इंद्रजीतने पत्नीची बाजू घेतली आणि दोघींमध्ये पुन्हा भांडण झाले. तेव्हा करिष्माने स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या चाकूने सासूवर दोन वार केले. ती रक्तबंबाळ झाल्याने मुलाने तिला सायन रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)