मुंबई : हँकॉक ब्रिज लवकरात लवकर तयार होऊन त्याचे लोकार्पण व्हावे, यासाठी रविवारी माझगाव येथील नुरबागमध्ये स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत ३ हजार ५०० नागरिकांनी सहभाग घेत स्वाक्षरी केली. स्वाक्षरी मोहिमांच्या माध्यमातून रेल्वेच्या ढिसाळ कामगिरीवर पुन्हा एकदा जनक्षोभ रस्त्यावर उतरला, असे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य सचिव समीर शिरवडकर यांनी सांगितले.हँकॉक पूल प्रकरणी नुकतेच रेल्वेच्या कामकाजावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. अनेक वर्षांपासून हँकॉक पूल प्रकरण प्रलंबित असल्याने त्याचा त्रास नागरिकांना आणि प्रवाशांना सहन करावा लागतो. यासाठी समीर शिरवडकर यांनी नूरबाग नाका येथे स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले होेते. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोहीम सुरू होती. तब्बल ३ हजार ५०० नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होत स्वाक्षºया केल्या.स्वाक्षºयांच्या माध्यमातून लोकांनी शासनाच्या ढिसाळ कामगिरीबाबत तीव्र नाराजी जाहीर केली.
हँकॉक पूल : स्वाक्ष-यांच्या मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:11 AM