Join us

गोखले पूल लष्कराच्या हवाली करा, डॉ. दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: November 12, 2022 3:19 PM

लोकमतने गोखले पूल बंद होण्याआधीपासून सातत्याने गोखले पूलाचा प्रश्न मांडला आहे.

मुंबई - अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल हा गेल्या सोमवारपासून बंद केल्याने येथील एस.व्ही.रोड, जे.पी.रोड,लिंक रोड,अंधेरी सब वे,कॅप्टन विनायक गोरे पूल, इर्ला जंक्शन,पार्ले स्टेशन या विविध भागात मोठी वाहतूक कोंडी होते.रोजचे 20 ते 25 मिनिटांचे अंतर कापायला आता किमान एक ते दीड तास लागत असल्याने सांताक्रूझ ते जोगेश्वरी भागात राहणारे नागरिक तर त्रस्त झाले आहेत.

गोखले पूलाचे काम लवकर होण्यासाठी या पूलाचा अभ्यास करून तो लवकरात लवकर होण्यासाठी लष्कराच्या हवाली करावा. तसेच वलसाड रोड ओव्हर ब्रिजचे काम एका खाजगी कंपनीने 20 दिवसात पूर्ण केले. त्याप्रमाणे वलसाड पटॅन वापरावा अशी ही विनंती डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

लोकमतने गोखले पूल बंद होण्याआधीपासून सातत्याने गोखले पूलाचा प्रश्न मांडला आहे. लोकमतच्या दि, 8 च्या अंकात पूल बंद.... वाहतूक बंद या मथळ्याखाली गोखले पूल बंद झाल्याने मोठी वाहतूक कोंडी होत असून नागरिकांचे अतोनात हाल होत असल्याचे विदारक चित्र या वृतांत नमूद केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी दखल घ्यावी अशी मागणी माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत व वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अँड.गॉडफ्रे पिमेंटा यांनी केली होती.लोकमतच्या बातमीचे कात्रण मुख्यमंत्र्यांनी वाचल्यावर त्यांनी लगेच पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना फोन करून गोखले पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत  वाहतुकीचे योग्य नियमन करावे,अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पुलावरील फेरीवाले हटवून येथील वाहतुकीचे योग्य नियमन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना आदेश दिल्यानंतर  गोखले पुलाची गेल्या गुरुवारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त वेलारासू  यांनी पाहाणी केली. पण अजूनही येथील वाहतूक कोंडी अजून सुटली नाही .कॅप्टन गोरे पूल ,विलेपार्ले पू /प, सांताक्रुज पश्चिम, अंधेरी पश्चिम व पूर्व  , मृणाल गोरे पूल येथील वाहतूक कोंडीने या पूलाला जोडणारे रस्ते जाम होतात. मात्र अजूनही या भागातील वाहतूक कोंडी सुटली नाही अशी माहिती डॉ. दीपक सावंत यांनी दिली. 

टॅग्स :दीपक सावंतएकनाथ शिंदेमुंबई