लंगडी स्पर्धेत नगरबाह्य शाळांचे वर्चस्व

By admin | Published: December 26, 2016 06:54 AM2016-12-26T06:54:31+5:302016-12-26T06:54:31+5:30

नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकेच्या सांघिक लंगडी स्पर्धेत मुलांच्या गटात धामणगाव मराठी शाळेने वर्चस्व राखले तर मुलींच्या गटात झालेल्या स्पर्धेत तानसा मराठी शाळेने विजेतेपद मिळवले.

Handicapped school domination in langis | लंगडी स्पर्धेत नगरबाह्य शाळांचे वर्चस्व

लंगडी स्पर्धेत नगरबाह्य शाळांचे वर्चस्व

Next

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकेच्या सांघिक लंगडी स्पर्धेत मुलांच्या गटात धामणगाव मराठी शाळेने वर्चस्व राखले तर मुलींच्या गटात झालेल्या स्पर्धेत तानसा मराठी शाळेने विजेतेपद मिळवले.
मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग-उपविभाग शारीरि शिक्षण यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. धारावी येथील भारतरत्न राजीव गांधी क्रीडा संकुलात लंगडी, कबड्डी, खो-खो अशा स्पर्धांचे सामने खेळवण्यात आले.
लंगडी स्पर्धेत मुलांच्या गटात धामणगाव मनपा मराठी शालेय संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तर चकालाच्या हिंदी शालेय संघाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुलींच्या गटात तानसा मराठी शाळेने विजेतेपद आणि बर्वेनगर शालेय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
कबड्डी स्पर्धेत खारदांडा मनपा शाळेने अव्वल स्थानावर झेप घेतली. चिंचवलीच्या शाळेने दुसरे स्थान मिळवले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Handicapped school domination in langis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.