हाथ, मुंह और बम.... आरोग्यासाठी का आहेत महत्त्वाचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2018 04:03 PM2018-03-01T16:03:01+5:302018-03-01T16:03:01+5:30

गेल्या काही वर्षांपासून ‘स्वच्छतेचा अभाव’ हा मुद्दा प्रकाशझोतात आलेला आहे, जो आपल्या देशापुढील सद्यस्थितीतील एक ज्वलंत मुद्दा आहे.

Hands, mouth and bombs .... Why are they important for health? | हाथ, मुंह और बम.... आरोग्यासाठी का आहेत महत्त्वाचे?

हाथ, मुंह और बम.... आरोग्यासाठी का आहेत महत्त्वाचे?

Next

गेल्या काही वर्षांपासून ‘स्वच्छतेचा अभाव’ हा मुद्दा प्रकाशझोतात आलेला आहे, जो आपल्या देशापुढील सद्यस्थितीतील एक ज्वलंत मुद्दा आहे. स्वच्छतेच्या बाबतीत भारत अत्यंत असमाधानकारक पातळीवर आहे, विशेषत: उघड्यावर शौचास जाणे आणि तत्सम अन्य मुद्द्यांबाबतच्या आकडेवारीत तर भारताची तुलना जगातील अत्यंत गरीब राष्ट्रांसह केली जाऊ शकते. आर्थिक विकास आणि गरिबी हटाव या दोन्हीही बाबतीत जरी आपण मोठी झेप घेतली असली तरीही स्वच्छतेच्या बाबतीत मात्र आपली गाडी चुकलीच आहे. मात्र असे
असले तरीही, आता स्वच्छ भारत अभियानामुळे तरी स्वच्छतेच्या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे हे पाहून फार समाधान मिळते. आपण कोणत्याही समस्येकडे स्वतंत्रपणे पाहातो, समग्रपणे पाहात नाही आणि हीच चूक आपण स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या
मुद्द्यांबाबतही करतो. पाणी, स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता या तिन्ही मुद्द्यांचा समग्र विचार करण्याची गरज काय हे समजून घेण्यासाठी आपण मल-मौखिक हस्तांतरणाचा सिद्धांत, जो सर्वप्रथम जागतिक आरोग्य संघटनेने १९५८ साली, आकृतीच्या सहाय्याने मांडला होता तो समजून घेऊया. हा सिद्धांत मल-मौखिक आजार जंतूंवाटे नेमके कसे पसरतात त्याचा मार्ग स्पष्ट करतो. अर्थात, फीसेस (विष्ठा), फिंगर्स (बोटं), फ्लाईज (माशा, डास), फ्लुईड्स (द्रव पदार्थ) आणि फूड (अन्नपदार्थ) यामार्गे आजार पसरत असतात
असे हा सिद्धांत सांगतो. याकरीता पुरेशी स्वच्छतागृह, स्वच्छ पाणी आणि वेळोवेळी साबणाने हात धुणे यासारख्या सवयी लावून
आपण आजार पसरविणारा हा मार्ग नक्कीच रोखू शकतो, ज्याद्वारे वेगवेगळ्या टप्प्यांवर लहान मुले व मोठ्या माणसांच्या माध्यमातून विष्ठेतून, अस्वच्छ पाण्यातून आणि घाणीतून पसरणा-या आजारांना आळा बसेल आणि स्वच्छतेची सवय लागेल.

जंतूसंसर्गाला मोठ्या प्रमाणावर आळा बसविण्यासाठी व विष्ठेतून पसरणारे आजार रोखण्यासाठी स्वच्छतागृहांचा वापर करणे ही
पहिली पायरी आहे. केवळ स्वच्छतागृहांवरच लक्ष वेधण्याचे कारण म्हणजे त्यांची सर्वदूर असलेली गरज व व्याप्ती आणि वापराबाबतची उदासिनता. एखाद्या लहानशा खेड्यातील लोकही जेव्हा स्वच्छतागृहाचा वापर करणे टाळतात तेव्हा आजार पसरवणा-या जंतूंचा
प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता दुणावत जाते. शिवाय प्राणी, माती, पाणी या अन्य मार्गांनीही हे जंतू पसरतच जातात व त्यामुळे केवळ
उघड्यावर शौच करण्यास आळा घालणे या एकमेव मार्गाचा अवलंब करूनही जंतूसंसर्गास संपूर्णत: थांबवणे केवळ अशक्य होते.
जंतूसंसर्गाचे प्रमुख माध्यम म्हणजे पाणी आणि त्यामुळेच जंतूसंसर्ग रोखण्यासाठी स्वच्छ पाण्याचाच अवलंब करणे हे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. हेच कारण आहे की आपल्या संस्कृतीत, पिण्यासाठी पाणी हे थेट नैसर्गिक स्रोतांद्वारेच वापरले जाते, तसेच त्याचे
कोणत्याही प्रकारे शुद्धीकरण करण्याचीही गरज भासत नाही. जे पाणी डोळ्यांनाच नितळ दिसते तेच स्वच्छ व पिण्याजोगे आहे हा एकच
विश्वास मनामनात असतो. पाणी स्वच्छ दिसावे, त्याची चव चांगली लागावी आणि त्या पाण्याचा वास चांगला, स्वच्छ यावा एवढाच प्रयत्न पाण्याच्या शुद्धीकरणाच्यादृष्टीने केला जातो.

पाणी गाळून घेणे किंवा उकळवलेले पाणी वापरणे यामुळे आजार पसरविण्यावर निर्बंध येतो खरा परंतु त्याचबरोबर अन्न, माश्या आणि हात या अन्य वाहकांवरही नियंत्रण ठेवायला हवे. साबणाने हात धुणे हा तिसरा महत्त्वाचा उपाय हात धुतल्यामुळे जंतू जिथून पसरण्यास सुरूवात होते त्या मूळ ठिकाणीच अटकाव केला जातो. हात धुणे, हा जरी संसर्ग टाळण्यासाठी महत्त्वाचा उपाय असला तरीही, डायरिया वगैरेसारख्या
आजारांवर इलाज म्हणून त्याकडे पाहिले जाऊ शकत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. विशेषत: लहान मुलांच्या बाबतीत हात वारंवार धुणे हा
जंतूसंसर्ग टाळण्याचा एक रामबाण इलाज होऊ शकतो कारण लहान मुलांवर सतत नजर ठेवणे केवळ अशक्य असते.
हात धुण्याच्या अंतर्भावामागील मूळ कल्पना ही की यामुळे मल-मौखिक हस्तांतरणाला शक्य तितक्या अडथळ्यांद्वारे अटकाव निर्माण करणे.

साबण लावून हात धुणे, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ शौचालयांचा वापर करणे किंवा आमच्या सांगण्यानुरूप हात, तोंड आणि गुद् या तिन्ही बाबींचा अवलंब करून जंतूसंसर्ग नक्कीच उत्तमरीत्या टाळता येऊ शकतो. अनेक संशोधकांनीही हे सिद्ध केले आहे की पाणी, स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता या तिन्ही बाबींच्या किंवा या तिन्हीच्या संयोजनाद्वारे अतिसारसदृश आजारांना नक्की प्रतिबंध होऊ शकतो. चला एका क्षणासाठी हात धुण्याच्या क्रियेला बाजूला ठेवून देऊ, तर असे दिसते की शिक्षणाच्या प्रक्रियेदरम्यानसुद्धा, परिभाषित संकल्पना जसे, खरी शिकण्याची प्रक्रिया, विद्यार्थी-शिक्षक संवाद ज्यामुळे शिक्षण प्रक्रियेवर खरा परिणाम होतो त्याकडे दुर्लक्ष करून केवळ पायाभूत सुविधांवरच अधिक भर दिला जातो.

हात धुण्याप्रमाणेच आजवर स्वच्छता देखील, हात धुण्याची सवय अंगवळणी पाडण्याऐवजी, शौचालयांची संख्या, हात धुण्याच्या जागांची संख्या आणि हात पंपांची संख्या यावरच अवलंबून होती. स्वच्छ भारत अभियानाच्या चौथ्या वर्षात पदार्पण करत असताना आपल्याला दिसतयं की शौचालय उभारण्याऐवजी आता शौचालयाचा वापर करण्यावर आपले लक्ष केंद्रित झाले आहे. हा एक सकारात्मक बदल झाला असून वॉश किंवा स्वच्छतेबाबत वर्तणूक बदल घडवून आणण्याकामी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल) एक महत्त्वाचा अग्रणी घटक आहे.

जागतिक बाजारपेठेतील एक प्रभावी कंपनी असल्याने एचयूएलचा असा विश्वास आहे. की अब्जावधी लोकांचे आरोग्य प्रतिदिवशी अधिक चांगले व्हावे आणि या विश्वासावरच आम्ही भारतात वॉश या चळवळीद्वारे लोकांच्या स्वच्छताविषयक वर्तणुकीत बदल घडविण्याकामी
नेतृत्व करत आहोत. स्वच्छ आदत, स्वच्छ भारत हे अभियान एचयूएलच्या क्षमतेबद्दल आहे, ज्याद्वारे स्वच्छतेबाबत लोकांच्या
सवयींवर चांगल्यासाठी प्रभाव पाडणे आणि भारतीय लोकांच्या शौचविधीच्या सवयी, पाणी पिण्याच्या सवयी आणि हात धुण्याच्या सवयीत चांगले बदल घडवून आणण्यासाठी आहे. एचयूएलच्या उपक्रमांतून हे सिद्ध झाले आहे की वॉश अर्थात हात धुण्याच्या सवयींतील योग्य
बदलावर लक्ष केंद्रित केल्याने अपेक्षित परिणाम मिळतात.

उदाहरणार्थ, हे संशोधन, भारतात साबण लावून हात धुण्याबाबत वर्तणूक बदल हस्तांतरण (सुपरअम्मा), ही डॉ. एडम बिरान आणि त्यांच्या समूहाने केलेली एक गट-या दृच्छिक चाचणी, असे सिद्ध करते की, भावनिक आव्हानांच्या आधारावरच साबणाने हात धुण्याची सवय लावणे व त्यासाठी स्वच्छ भारत दूत आणि स्वच्छ आदत अभ्यासक्रम (स्वच्छतेच्या सवयींबाबत २१ दिवसांचे पाठ्यपुस्तक) आदींचा अवलंब करूनच ते शक्य होईल.

पाणी, स्वच्छता आणि आरोग्य या त्रिसूत्रीमुळे अतिसाराचा आजार लक्षणीयरित्या कमी होतो. आकडेवारी असे दर्शवते की, साबणाने हात धुतल्याने ४४ टक्के, घरातील पाण्यावर प्रक्रिया केल्याने ३९ टक्के, स्वच्छतेमुळे ३६ टक्के इतके अतिसाराचे प्रमाण कमी होते. 

स्वच्छ सवयींचा संदेश घेऊन एचयूएल लाखो भारतीयांपर्यंत पोहोचणार. एचयूएलच्या वॉश इंटरव्हेन्शन्सबाबत अधिक जाणून घेण्यासाठी लॉग ऑन करा www.hul.co.in/sasb

Web Title: Hands, mouth and bombs .... Why are they important for health?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.