मुंबईच्या बागेत बहरणार झुलत्या कुंड्या; ‘पिटोनिया’च्या रोपामुळे सौंदर्यात भर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 03:58 AM2020-01-22T03:58:19+5:302020-01-22T03:58:48+5:30

दक्षिण मुंबईतील पालिकेच्या वॉल्टर डिसोजा उद्यानात लावलेल्या झुलत्या कुंड्यांचा प्रयोग नागरिकांच्या पसंतीस उतरू लागला आहे.

Hanging wells in the garden of Mumbai; 'Petonia' plant adds beauty | मुंबईच्या बागेत बहरणार झुलत्या कुंड्या; ‘पिटोनिया’च्या रोपामुळे सौंदर्यात भर

मुंबईच्या बागेत बहरणार झुलत्या कुंड्या; ‘पिटोनिया’च्या रोपामुळे सौंदर्यात भर

Next

मुंबई : दक्षिण मुंबईतील पालिकेच्या वॉल्टर डिसोजा उद्यानात लावलेल्या झुलत्या कुंड्यांचा प्रयोग नागरिकांच्या पसंतीस उतरू लागला आहे़ या कुंड्यांमध्ये लावण्यात आलेल्या पिटोनिया या शोभेच्या झाडाच्या रोपाने उद्यानाच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे़ त्यामुळे असे प्रयोग मुंबईतील अन्य उद्यानांमध्येही लवकरच होण्याची शक्यता आहे. 

महापालिकेची मुंबईत ७०० उद्याने आहेत़ वासुदेव बळवंत चौकाकडून गोल मशिदीकडे जाणाऱ्या आनंदीलाल पोदार मार्गालगत डिसोजा उद्यान आहे. आनंदीलाल पोदार मार्ग, सिनेमा गल्ली (बरॅक रोड) व विठ्ठलदास ठाकरसी मार्ग या तीन मार्गांच्या मध्ये असणाºया या उद्यानात २०२० या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी १०० झुलत्या कुंड्या बसविण्यात आल्या आहेत.

या झुलत्या कुंड्यांमध्ये ‘पिटोनिया’ या शोभेच्या झाडाची रोपे लावण्यात आली आहेत. झुलत्या कुंड्या आणि त्यात असलेल्या झाडाला बहरलेल्या विविधरंगी फुलांमुळे या उद्यानाचे रूपडे पालटले आहे़ या उद्यानात येणा-या नागरिकांना हा प्रयोग अतिशय आवडला असल्याचे, पालिकेच्या ए विभागाच्या सहायक आयुक्त चंदा जाधव यांनी सांगितले़

खेळासह अभ्यासिकाही
सन १९४८च्या आॅलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय हॉकी संघामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे क्रीडापटू वॉल्टर डिसोजा यांच्या स्मरणार्थ हे उद्यान सुमारे ४३ हजार ९५० चौरस फुटांच्या भुखंडावर तयार करण्यात आले आहे़ या उद्यानात लहान मुलांसाठी घसरगुंडी, झुले, फिरते चक्र, खुली व्यायामशाळा, बसण्यासाठी बाके आहेत. स्थानिक विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सुलभ व्हावे, यासाठी ५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली अभ्यासिकादेखील या उद्यानात आहे़
 

Web Title: Hanging wells in the garden of Mumbai; 'Petonia' plant adds beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.