जिल्ह्यात हनुमान जयंती उत्साहात

By admin | Published: April 4, 2015 10:35 PM2015-04-04T22:35:32+5:302015-04-04T22:35:32+5:30

१०० वर्षांची परंपरा असणारा मुरुड तालुक्यातील खारआंबोली या गावची यात्रा रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री भरणार आहे. तालुक्यातील ही मोठी यात्रा समजली जाते.

Hanuman Jayanti excited in the district | जिल्ह्यात हनुमान जयंती उत्साहात

जिल्ह्यात हनुमान जयंती उत्साहात

Next

मुरुड : १०० वर्षांची परंपरा असणारा मुरुड तालुक्यातील खारआंबोली या गावची यात्रा रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री भरणार आहे. तालुक्यातील ही मोठी यात्रा समजली जाते. हनुमान जयंतीनिमित्त दुसऱ्या दिवशी भरणाऱ्या यात्रेत सर्वाधिक महादेवाच्या मानाच्या काठ्या वाजत - गाजत - नाचवत येतात.
मुरुड - शिघ्रा - आगरदांडा - रोहा मार्गावर खार आंबोली गांव लागते. येथे श्री हनुमानाचे प्रशस्त मंदिर असून या देवस्थानची प्रतिष्ठापना १९२३ मध्ये झालेली आहे. गावात आगरी ग्रामस्थांची सुमारे ३०० घरे असून परिसरात खतीबखार व आंबोली असे दोन भाग आहेत. हनुमानजयंतीनिमित्त दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक व ग्रामस्थ यात्रेसाठी येत असून मानाच्या काठ्यांना आदराने बोलवण्याची प्रथा आहे. रात्रौ १०.३० ते १ वाजेपर्यंत यात्रा भरते. त्यावेळी हर .... हर ... महादेवचा गजर करीत एकदरा, मिठागर, नांदला, कोंड आंबोली, वरची वावडुंगी, शिघ्रे आदिवासीवाडी तिसले वाडी, अशा अनेक मानकरी गावातून मिरवणुकीत वाजत - गाजत महादेवाचा गजर करीत मानाच्या काठ्या यात्रेत येतात. मारुतीराया रूद्राचे ११ वे अवतार समजले जातात. त्यामुळे हर हर महादेवाचा गजरकाठ्या नाचविताना केला जातो. काठ्यांना शिवलिंगाचा आकार असतो या काठ्यांची पूजा केली जाते. रात्री १२ वाजता येथे मारुतीरायांची गावातून पालखी निघते. यामध्ये खार आंबोलीच्या वीर बजरंग व्यायामशाळेचे व्यायामपटू दांडपट्टा, मल्लखांब, लाठी, छाटी असे शारीरिक कसरतीचे प्रयोग सादर करतात.

उरण : भक्तांच्या हाकेला धावून येणारा, भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा अशी ख्याती असलेला भगवान शंकराचा अवतार म्हणजे पवनपुत्र हनुमान होय. हनुमान जयंती विविध ठिकाणी विविध पध्दतीने साजरी केली जाते. उरणमध्येही संपूर्ण तालुक्यात विविध सामाजिक तसेच धर्मिक तर काही ठिकाणी सांस्कृतिक स्वरूपात ही जयंती साजरी केली जाते. उरणमध्ये करंजा, हनुमान कोळीवाडा, मुळेखंड, मोरा, आवरा , गणपती चौक, चिरनेर बाजारपेठ असे अनेक ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने हनुमान जयंती साजरी केली जाते.
उरणमध्ये हनुमान जयंतीनिमित्त भजन, कीर्तन, अन्नप्रसाद, पालखी मिरवणूक, सामाजिक संदेशपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भक्तांनी अलोट गर्दी केली होती. (वार्ताहर)

मोहोपाडा : वावेघर येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात व थाटामाटात झाला. त्यानिमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा झाला. यावेळी बाळकृष्ण महाराज पाटील, तुकाराम महाराज केदारी, बाळाराम महाराज मते, पांडुरंग महाराज म्हात्रे, रघुनाथ महाराज भगत, कृष्णा महाराज जोडे यांच्या प्रवचनाचा व कीर्तनाचा कार्यक्र म झाला. या कार्यक्र माला आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती लावली होती. (वार्ताहर)

च्रेवदंडा : रेवदंड्याचे ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरात कीर्तन, भजन आदी कार्यक्रमांनी हनुमान जयंती साजरी झाली. यावेळी आकर्षण रोषणाई, रांगोळ्या काढल्या होत्या. भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. चौलमधील हनुमान पाडामध्ये मोगालाईत वाचलेल्या गडग्यातला मारुती म्हणून प्रसिध्द असलेल्या पुरातन मंदिरात पंचक्रोशीतील भक्त मंडळीनी गर्दी केली होती.

Web Title: Hanuman Jayanti excited in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.