मुंबईकरांच्या स्पिरिटला सलाम! दुस-या दिवशीही हाल कायम;  नौदल, धर्मस्थळ, मंडळ मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 05:50 AM2017-08-31T05:50:54+5:302017-08-31T05:51:00+5:30

महापुराच्या रूपात मुंबईला झोपडून काढणाºया अतिवृष्टीमुळे मुंबईकरांचे मंगळवारी अतोनात हाल झाले. मात्र या त्रासातही दिलासा देण्यासाठी सरसावलेल्या नौदलासह धार्मिक स्थळे आणि मंडळांच्या स्पिरीटला मुंबईकरांनी सलाम केला.

Happiness of Mumbai's spirits! The situation persists on the next day; Naval, Shree Temple, Board to help | मुंबईकरांच्या स्पिरिटला सलाम! दुस-या दिवशीही हाल कायम;  नौदल, धर्मस्थळ, मंडळ मदतीला

मुंबईकरांच्या स्पिरिटला सलाम! दुस-या दिवशीही हाल कायम;  नौदल, धर्मस्थळ, मंडळ मदतीला

googlenewsNext

मुंबई : महापुराच्या रूपात मुंबईला झोपडून काढणाºया अतिवृष्टीमुळे मुंबईकरांचे मंगळवारी अतोनात हाल झाले. मात्र या त्रासातही दिलासा देण्यासाठी सरसावलेल्या नौदलासह धार्मिक स्थळे आणि मंडळांच्या स्पिरीटला मुंबईकरांनी सलाम केला. दरम्यान, कशीबशी रात्र काढलेल्या मुंबईकरांच्या त्रासात रेल्वेमधील तांत्रिक बिघाडामुळे बुधवारीही भर पडली.
अतिवृष्टीने मंगळवारी रात्री बहुतेक चाकरमान्यांनी कार्यालयातच राहणे पसंत केले. कार्यालयानजीकच्या टपरीपासून हॉटेलपर्यंत धाव घेत बहुतेकांनी पोटाची खळगी भरली. उच्च न्यायालयाच्या सुमारे ३०० कर्मचाºयांनी उच्च न्यायालयातच रात्र घालवली. मंत्रालयातील कर्मचाºयांची परिस्थितीही काही वेगळी नव्हती. याउलट घराच्या ओढीने मिळेल त्या साधनाने कार्यालय सोडलेल्या चाकरमान्यांना बस, ट्रेनमध्ये अडकून राहावे लागले. त्यांच्या मदतीसाठी विविध संस्था, संघटना, धार्मिक स्थळे आणि नौदलाचे जवान धावले. नौदलाचे शेकडो जवान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून दादर, सायन अशा विविध ठिकाणी अल्पोपाहार आणि जेवण वाटताना दिसले. हे कार्य बुधवारी दुपारीही सुरू होते.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी मंडपांची दारे उघडल्याचे पाहायला मिळाले. लालबागचा राजा, प्रभादेवीचा राजा, मुंबईचा राजा (गणेशगल्ली), ताडदेवचा राजा अशा विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रात्री भक्तांसह सर्वसामान्य मुंबईकरांना जेवणासह निवाºयाची व्यवस्था उभी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. दक्षिण मुंबई व मध्य मुंबईतील गुरुद्वारा, मशीद आणि चर्चमध्ये अनेक लोकांना विसावा घेता आला. याशिवाय महापालिकेने शाळांचे गेट उघडत मुंबईकरांना आसरा दिल्याचेही निदर्शनास आले. शाळांसोबतच काही महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना प्राधान्य देत सर्वसामान्य मुंबईकरांना निवारा दिला होता. रेल्वे फलाटांवरही अनेक मुंबईकरांनी आपली रात्र घालवली. मात्र रात्रभर पावसाने उसंत घेतल्याने किमान सकाळी तरी घरी सहज पोहोचण्याची मुंबईकरांची अपेक्षा फोल ठरली. मध्य रेल्वेची वाहतूक दुपारपर्यंत विस्कळीतच होती. सीएसएमटी स्थानकावर मुक्काम ठोकलेल्या मुंबईकरांत सकाळनंतर आलेल्या मुंबईकरांची भर पडली. सकाळी ८ वाजता चिंचपोकळीवरून पकडलेली लोकल सकाळी ११ वाजता कुर्ला येथे पोहोचल्याचे प्रसाद पवार या प्रवाशाने सांगितले.

ख-या अर्थाने ‘सोशल’ झाला मीडिया
एरव्ही केवळ ‘व्हायरल’च्या नादाला लागून पोस्ट्स फॉरवर्ड करणाºया नेटीझन्सने, मंगळवारी मात्र खºया अर्थाने इंटरनेट साइट्सचा ‘सोशल’ वापर केला.
मंगळवारी पावसाचा जोर जसजसा वाढत गेला, तसा नेटीझन्सने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर आणि इन्स्टाग्रामवरून वेळोवेळी ‘अपडेट्स’ टाकल्याने, बºयाच मुंबईकरांना सुरक्षित स्थळी पोहोचणे सोयीचे ठरले.

सोशल मीडिया म्हटले की, केवळ चुकीच्या पोस्टस् शेअर होऊन दूषणे देणाºया वार्ताच ऐकू येतात. मात्र, मंगळवारी याउलट परिस्थिती दिसून आली.

सोशलच्या माध्यमातून मदतकार्य करणारी मंडळे, संस्था, संघटना यांच्याविषयी माहिती देणाºया पोस्ट्स शेअर झाल्या. शिवाय वाहतूककोंडी असलेल्या ठिकाणाची योग्य माहिती मिळाल्याने, बºयाच चाकरमान्यांची वाहतूककोंडीपासूनही सुटका झाली.

मीडियामुळे आपल्या माणसांना केवळ एका फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून सुरक्षित असल्याचे पाहून, जीव भांड्यात पडला.

Web Title: Happiness of Mumbai's spirits! The situation persists on the next day; Naval, Shree Temple, Board to help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.