हॅपी बर्थ डे...  बेस्टच्या डबलडेकरचा आज ८५वा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 09:20 AM2022-12-08T09:20:14+5:302022-12-08T09:20:53+5:30

मुंबईतील डबलडेकर बसमधून एकदा तरी प्रवास करायचा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. भारतात केवळ मुंबईच्या रस्त्यांवरून डबलडेकर धावत असून बेस्ट उपक्रमाच्या या डबलडेकर बसला तशी ऐतिहासिक ओळख आहे

Happy Birthday... 85th Birthday of BEST's Double Decker today | हॅपी बर्थ डे...  बेस्टच्या डबलडेकरचा आज ८५वा वाढदिवस

हॅपी बर्थ डे...  बेस्टच्या डबलडेकरचा आज ८५वा वाढदिवस

googlenewsNext

 रतींद्र नाईक

मुंबई : ऐतिहासिक ठेवा असलेली बेस्ट उपक्रमाची डबलडेकर मुंबईच्या रस्त्यांवरून आजही ऐटीत धावत आहे.  बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात असलेली पहिली दुमजली बस ब्रिटिशांच्या काळात ८ डिसेंबर १९३७ साली धावली. गुरुवारी या दुमजली बसला ८५ वर्षे पूर्ण होणार असून बेस्टची डबलडेकर लवकरच नव्या ढंगात दिसणार आहे.

मुंबईतील डबलडेकर बसमधून एकदा तरी प्रवास करायचा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. भारतात केवळ मुंबईच्या रस्त्यांवरून डबलडेकर धावत असून बेस्ट उपक्रमाच्या या डबलडेकर बसला तशी ऐतिहासिक ओळख आहे.  विशेषतः दक्षिण मुंबईत डबलडेकर धावत असून या डबलडेकरमधून प्रवास करायचा या कुतूहलापोटी या बसला नेहमीच मुंबईकरांची गर्दी असते. बेस्टच्या ताफ्यात सध्या ४५ डबलडेकर बस असून ओपन डेक असलेल्या ५ बसेस आहेत. 

निलंबरी आणि विभावरी
ओपन डेक असलेल्या ५ बसेस पैकी २ बसेसना निलांबरी आणि विभावरी अशी नावे देण्यात आली असून त्यापैकी २ बसेसना ट्रामचा लूक देण्यात आला आहे. या बसेस मुंबई हेरिटेज टूर म्हणून उत्तर मुंबईत चालवल्या जातात. अप्पर डेकसाठी १५० रुपये तर लोअर डेकसाठी ७५ रुपये दर आकारले जातात. दररोज सायंकाळी मुंबईच्या रस्त्यांवरून या बस धावत असून विकेंडला या बसला तुफान प्रतिसाद मिळतो, अशी माहिती बेस्टचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी दिली.

वाढदिवस, पार्टी करा डबल डेकरमध्ये
ओपन डेक असलेल्या या बस भाड्यानेही दिल्या जातात. या बसमध्ये वाढदिवस, पार्ट्याही केल्या जातात. १२ हजार रुपये अधिक १२.५% जीएसटी किंवा मूळ भाडे ४ हजारसह प्रति कि.मी. १०० रुपये व त्यावर जीएसटी असे दर आकारले जातात.

 

Web Title: Happy Birthday... 85th Birthday of BEST's Double Decker today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट