मुंबई - देशभरात जुन्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आले. जुन्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईसह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
गोव्यासह विविध पर्यटनस्थळे नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. तसेच नववर्षाची सुरुवात देवदर्शनाचे करण्यासाठी अनेकांनी मंदिरांमध्येही गर्दी केली आहे.
स्काय टॉवरवर लावलेल्या भल्या मोठ्या घड्याळामध्ये रात्री बारा वाजल्यानंतर तुफान आतषबाजीला सुरुवात झाली. सर्वात पहिल्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जगभरातील पर्यटकांनी न्यूझीलंडमध्ये धाव घेतली आहे. तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये देखील नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर नववर्षानिमित्त नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.
जगातल्या प्रत्येक देशात सूर्य उगवण्याची वेळ वेगवेगळी आहे. आणि त्यानुसार तिथे तिथे सरत्या वर्षाला अलविदा देऊन नववर्षाचं स्वागत केलं जातं. पृथ्वीच्या प्रदक्षिणासोबत प्रत्येक देशाची वेळ ठरवली जाते. झगमगत्या रोषणाईत, फटाक्यांच्या आतिषबाजीत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये नववर्षाचं स्वागत केलं.