Join us

नववर्षाचे जोरदार स्वागत; ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन, पारंपरिक वेश, कवायती ठरल्या आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2022 5:57 AM

दोन वर्षांनंतर मराठी नववर्षांचे स्वागत करण्यात मुंबईकरांनी कुठलीच कसर सोडली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : दोन वर्षांनंतर मराठी नववर्षांचे स्वागत करण्यात मुंबईकरांनी कुठलीच कसर सोडली नाही. मुंबई व उपनगरात  शोभा यात्रांचे आयोजन करण्यात आले हेाते. शाेभा यात्रांमधील पारंपारिक वेश व कवायती प्रमुख आकर्षण ठरल्या. 

दहिसर पश्चिम शिवसेना शाखा क्रमांक ७ मध्ये  म्हात्रेवाडी रेसिडेंट्स वेल्फेयर असोसिएशन तसेच हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शोभायात्रा काढण्यात आली. श्री पार्लेश्वर मंदिर ते स्वामी समर्थ मठ अशी ही  शोभायात्रा काढण्यात आली. कांदिवली चारकोप येथील श्री एकवीरा विद्यालयाच्या प्रांगणात कागदापासून तयार केलेली ७५ फूट उंच व ७५ मिमी.ची छोटी गुढी उभारली होती. 

आम्ही दादरकरच्या शोभायात्रेत स्वरनाद

कोरोनाच्या सावटातून बाहेर पडलेल्या मुंबईत यंदा ठिकठिकाणी दिमाखात शोभायात्रा काढून नववर्षाचे स्वागत केले गेले. आम्ही दादरकर आणि वेध फाउंडेशन आयोजित शोभायात्रेत अभंग रिपोस्ट या तरुणाईच्या म्युझिकल ग्रुप बँडने आपल्या अनोख्या सुरावटींनी उपस्थितांची मने जिंकली. या बँडच्या गाण्यांवर सर्वच वयोगटांतील प्रेक्षक खूश झाले. या शोभायात्रेत वेगवेगळ्या भागांतून आलेले असंख्य तरुण वारकरी सहभागी झाले होते.

गुंदवलीत उभारली २१ फूट उंच गुढी

श्री साई श्रद्धा सेवा संस्था गुंदवलीचा मोरया मंडळातर्फे गुढीपाडव्यानिमित्त उपनगर मुंबईतील सर्वात २१ फूट उंच गुढी उभारून मराठी नवीन वर्षाच्या आगमनाची सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, भगवतगीता वाटप करण्यात आले.

बोरीवलीत मिरवणूक

शिवसेना बोरिवली विधानसभा आयोजित  गुढीपाडवा  शोभायात्रा मिरवणूक शिंपोली गाव,  ब्रम्हा, विष्णू, महेश मंदिराकडून  मराठी पारंपरिक वेशभूषा, विठुरायाची  दिंडी, आगरी कोळी वेषभूषा आणि नृत्य, छत्रपतींची घोड्यावर सवारी, मावळे, ढोल-ताशे   अशी वाजत गाजत ही मिरवणूक काढण्यात आली.

टॅग्स :गुढीपाडवा