शाळांमध्ये साजरा होणार हॅप्पी सॅटर्डे’; पालिका शाळांतील मुलांसाठी लायब्ररी इन बॅग ही मिळणार

By सीमा महांगडे | Published: February 9, 2024 08:44 PM2024-02-09T20:44:46+5:302024-02-09T20:44:54+5:30

प्रत्येक शाळेत ‘हॅप्पी सॅटर्डे’ ही संकल्पना राबविण्याचा मानस शिक्षण विभागाचा आहे .

Happy Saturday will be celebrated in schools | शाळांमध्ये साजरा होणार हॅप्पी सॅटर्डे’; पालिका शाळांतील मुलांसाठी लायब्ररी इन बॅग ही मिळणार

शाळांमध्ये साजरा होणार हॅप्पी सॅटर्डे’; पालिका शाळांतील मुलांसाठी लायब्ररी इन बॅग ही मिळणार

मुंबई: प्रत्येक शाळेत ‘हॅप्पी सॅटर्डे’ ही संकल्पना राबविण्याचा मानस शिक्षण विभागाचा आहे . त्यासाठी शाळांमध्ये प्रत्येक शनिवारी मुलांसाठी अभ्यासाव्यतिरिक्त केवळ अवांतर वाचन, खेळ, छंद जोपासणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या शिवाय पालिका शाळांमध्ये लायब्ररी इन बॅग हं उपक्रम ही राबविण्यात येणार असून  यामुळे विद्यार्थ्यांचा शब्दसाठा वाढण्यास मदत होईल, त्यांचे वक्तृत्व सुधारेल अशी माहिती राज्याचे  शिक्षणमंत्री व शहर विभागाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

पालिकेच्या वरळी सी-फेस शाळेत शुक्रवारी स्त्री शिक्षणावर आधारित ‘आय अॅम बनी’ या चित्रपटाचा ट्रेलर दाखविण्यात आला तसेच ‘लायब्ररी इन बॅग’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी केसरकर बोलत होते. महानगरपालिकेच्या नियोजन विभागाकडून महानगरपालिकेच्या १२० शाळांत ‘लायब्ररी इन बॅग’ किट देण्यात येणार आहे. या शिवाय बालभारतीकडून उर्वरित शाळांमध्ये हे किट्स पुरविण्यात येतील.‘आय अॅम बन्नी’ हा चित्रपटराहुल कनाल यांच्या सहकार्याने पालिकेच्या शाळांतील ६० हजार विद्यार्थ्यांना विनामूल्य दाखविण्यात येईल, अशी माहिती ही केसरकर यांनी दिली.

३० हजार मुलांना पुस्तके हाताळता येणार

शाळेतील प्रत्येक मुलास वाचनाची गोडी लागावी म्हणून ‘लायब्ररी इन बॅग’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नायरा एनर्जी या संस्थेच्या सामाजिक दायित्व निधीतून हा उपक्रम राबविण्यात आला. १२० शाळांना हे किट देण्यात येणार असून, त्याद्वारे ३० हजार मुलांना पुस्तके हाताळता येणार असल्याची माहिती नियोजन विभागाच्या संचालिका प्राची जांभेकर यांनी दिली.

Web Title: Happy Saturday will be celebrated in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.