हर हर महादेव... जयंत पाटील केदारनाथला, राज्याच्या विकासासाठी भोलेनाथाला प्रार्थना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 12:45 PM2022-06-07T12:45:02+5:302022-06-07T12:46:21+5:30
राज्याला विकासाच्या पथावर आणि जनतेला सुखसमृद्धी लाभो; अशी प्रार्थना केल्याचं त्यांनी सांगितलं
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्रीजयंत पाटील यांनी नुकतेच सहकुटुंब केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाचे आणि बद्रीनाथ येथे जाऊन भगवान विष्णूचे दर्शन घेतले. यावेळी, राज्याला विकासाच्या पथावर व जनतेला सुखसमृद्धी लाभो अशी प्रार्थना त्यांनी केली. देवदर्शनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत मंत्री पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हर हर महादेव!
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 7, 2022
संपूर्ण कुटुंबासह बारा ज्योतर्लिंगांपैकी एक असलेल्या प्राचीन अशा केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाचे आणि बद्रीनाथ येथे भगवान विष्णूचे दर्शन घेतले. विशाल पर्वतांनी सामावून घेतलेल्या, निसर्गाचे वरदान असलेल्या या भूमीचे पावित्र्य मनाला सकारात्मकता देऊन गेले. pic.twitter.com/FYAk9Alkqq
जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये हर हर महादेव! संपूर्ण कुटुंबासह बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्राचीन अशा केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाचे आणि बद्रीनाथ येथे भगवान विष्णूचे दर्शन घेतले. विशाल पर्वतांनी सामावून घेतलेल्या, निसर्गाचे वरदान असलेल्या या भूमीचे पावित्र्य मनाला सकारात्मकता देऊन गेले असे त्यांनी म्हटले. सध्या देवदर्शन करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची चढाओढ चालली आहे. तर, दुसरीकडे अयोध्या दौरा चर्चेचा विषय बनत आहे. मात्र, जयंत पाटील यांनी केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिराला गाजावाजा न करता भेट देत दर्शन घेतले.
माझ्या यश-अपयशात, सुख-दुःखात नेहमीच साथ दिलीत, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खांद्याला खांदा लावून माझ्या संगिनी बनलात. शैलजा, तुम्ही खऱ्या अर्थाने माझी सहचारिणी ठरलात!
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 7, 2022
तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा💐 pic.twitter.com/GreMbBgwsf
विशेष म्हणजे आजच जयंत पाटील यांच्या पत्नी शैलजा यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानेही जयंत पाटील यांनी ट्विटवरुन पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खांद्याला खांदा लावून माझ्या संगिनी बनलात. शैलजा, तुम्ही खऱ्या अर्थाने माझी सहचारिणी ठरलात! असे त्यांनी म्हटले.