हार्बर गोरेगाव लोकलचे सारथ्य कोणाकडे?

By महेश चेमटे | Published: February 24, 2018 04:57 AM2018-02-24T04:57:11+5:302018-02-24T04:57:30+5:30

गोरेगावपर्यंतच्या हार्बर विस्ताराचे काम अनेक अडचणींनंतर पूर्ण झाले. नुकतीच रेल्वे सुरक्षा आयोगाने या मार्गावर चाचणीही घेतली.

Harbor Goregaon Lokalera sarthya? | हार्बर गोरेगाव लोकलचे सारथ्य कोणाकडे?

हार्बर गोरेगाव लोकलचे सारथ्य कोणाकडे?

Next

मुंबई : गोरेगावपर्यंतच्या हार्बर विस्ताराचे काम अनेक अडचणींनंतर पूर्ण झाले. नुकतीच रेल्वे सुरक्षा आयोगाने या मार्गावर चाचणीही घेतली. मात्र मोटरमनची कमतरता असल्याने गोरेगाव हार्बरपर्यंतच्या मार्गावर धावणाºया या लोकलमध्ये मोटरमन ‘मध्य की पश्चिम’ रेल्वेचे असणार याबाबत दोन्ही रेल्वे प्रशासनामध्ये वाद सुरू आहेत. दरम्यान, शुक्रवारी निश्चित केलेल्या रेल्वेमंत्र्यांच्या उद्घाटन यादीत ‘हार्बर गोरेगाव उद्घाटन’ या कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात कोणते प्रशासन या लोकलवर मोटरमन नियुक्त करणार याबाबत संभ्रम कायम आहे.
सद्य:स्थितीत मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासन मोटरमनच्या कमतरतेमुळे त्रस्त आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/कसारा/कर्जत मार्गावर रोज १ हजार ७३२ लोकल फेºया होतात. या फे ºयांसाठी मध्य रेल्वेकडे ६७५ मोटरमन आहेत. मध्य रेल्वेला एकूण ८९८ मोटरमनच्या पदांसाठी मंजुरी आहे. परिणामी मध्य रेल्वेला २२३ मोटरमनची गरज आहे. यामुळे हार्बर मार्गावर सुरू होणाºया नव्या लोकलसाठी मध्य रेल्वे अनुत्सुक असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार/डहाणू/ पालघरपर्यंत रोज १ हजार ३५५ लोकल फेºया होतात. पश्चिम रेल्वेमध्ये ४७९ मोटरमन आहेत.
मंजूर जागांपैकी २० टक्के जागा मोटरमनअभावी रिक्त असल्याचे पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. यामुळे आधीच मोटरमनची कमतरता असल्याने गोरेगाव हार्बरपर्यंतच्या मार्गावर धावणाºया लोकलमध्ये मोटरमन ‘मध्य की पश्चिम’ रेल्वेचे असणार याबाबत दोन्ही रेल्वेमध्ये वाद सुरू असल्याचे चित्र आहे.
हार्बर गोरेगाव विस्तारीकरणाचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाने पूर्ण केले आहे. हार्बर गोरेगावपर्यंतच्या मार्गावर सर्वप्रथम मध्य रेल्वे बम्बार्डिअर बांधणीची लोकल चालवणार आहे. तथापि मोटरमनच्या कमरतेमुळे कोणी मोटरमन देता का मोटरमन! अशी अवस्था असल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अधिकारी सांगतात.

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन
एल्फिन्स्टन दुर्घटनेत चेंगराचेंगरीमुळे २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या वेळी मुंबई उपनगरीय स्थानकांवर तीन पादचारी पुलांच्या उभारणीसाठी लष्कराला पाचारण करण्याची घोषणा करण्यात आली होती. २७ फेब्रुवारीला रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासह संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उपस्थित राहणार आहेत. या वेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करी रोड, आंबिवली आणि एल्फिन्स्टन रोड स्थानकांतील लष्कराच्या पुलांचे उद्घाटन करतील. या वेळी आपत्कालीन वैद्यकीय कक्ष, मध्य रेल्वेतील पादचारी पूल यांचेदेखील व्हिडीओ कॉन्फरन्सच्या मदतीने लोकार्पण करण्यात येणार आहे.

Web Title: Harbor Goregaon Lokalera sarthya?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.