एसी लोकल आधी हार्बरवर

By admin | Published: March 18, 2016 02:50 AM2016-03-18T02:50:50+5:302016-03-18T02:50:50+5:30

पश्चिम रेल्वेवर बहुप्रतीक्षेत असणारी वातानुकूलित लोकल आता ‘परे’ऐवजी हार्बर रेल्वेवर धावणार आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘परे’वर वातानुकूलित लोकल धावण्याची तयारी पूर्ण झाली असतानाच

Harbor line before AC Local | एसी लोकल आधी हार्बरवर

एसी लोकल आधी हार्बरवर

Next

मुंबई : पश्चिम रेल्वेवर बहुप्रतीक्षेत असणारी वातानुकूलित लोकल आता ‘परे’ऐवजी हार्बर रेल्वेवर धावणार आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘परे’वर वातानुकूलित लोकल धावण्याची तयारी पूर्ण झाली असतानाच अचानक गुरुवारच्या निर्णयाने चांगलाच गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे हार्बरच्या प्रवाशांना आॅक्टोबरपासून गारेगार प्रवासाचा आनंद घेणार आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी टिष्ट्वट करत मरेच्या प्रवाशांना एसी लोकलची भेट मिळणार असल्याचे म्हटले. त्यामुळे सुरुवातीला मुंबईकरांना आणखी एका लोकलचा लाभ मिळणार असल्याची प्रतिक्रिया उमटली. मात्र, त्यानंतर ‘परे’च्या प्रवाशांसाठी जाहीर झालेली वातानुकूलित लोकल आॅक्टोबरपासून सुरू होण्याची अपेक्षा होती. अचानक रेल्वेमंत्री प्रभू यांच्या ट्विटमुळे खळबळ उडाली. टिष्ट्ववरवरील घोषणेमुळे सर्वप्रथम ‘परे’ आणि ‘मरे’वर स्वतंत्रपणे वातानुकूलित लोकल धावतील, असा समज पसरला. पण, थोड्याच वेळात वातानुकूलित लोकल हार्बरवर धावणार असल्याचे स्पष्ट होताच धक्काच बसला.
चेन्नई येथील ‘आयसीएफ’ कारखान्यात अंतिम टप्प्यात येत असतानाच वातानुकूलित लोकल हार्बरवर चालवण्याची शक्यता आहे. साधारणपणे, हार्बर वा ट्रान्सहार्बरवर ही वातानुकूलित लोकल चालवली जाण्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ‘भेल’ (भारत हेवी इलेक्ट्रिकल लि.)च्या बनावटीची ही लोकल प्रत्यक्षात रुळावर येण्यासाठी आॅक्टोबर उजाडणार आहे. तर, या लोकलच्या चाचण्या एप्रिल अखेरपासून होणार असल्याचे ‘मरे’चे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी सांगितले. या चाचण्यांमधून येणाऱ्या निष्कर्षातून त्यात अपेक्षित बदल करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

निर्णयबदलाचे
कारण गुलदस्त्यात
या साऱ्या निर्णयप्रक्रियेत ‘परे’ऐवजी हार्बरची निवड करण्यामागील कारण समोर आलेले नाही. याबाबत, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत.

‘भेल’च्या बनावटीमुळे बदल?
मध्य रेल्वेवर यापूर्वी ‘भेल’ बनावटीच्या लोकल चालवण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकल सेवेत एकसंधपणा राहण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने या लोकल मध्य रेल्वेवर चालवण्याची आग्रही भूमिका घेतली होती. त्यातूनच हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: Harbor line before AC Local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.