ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर मार्गावर वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 04:45 PM2019-04-01T16:45:53+5:302019-04-01T17:29:06+5:30
किलोमीटर क्रमांक 47 जवळ ही ओव्हरहेड वायर तुटली आहे.
पनवेल : खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ हार्बर मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याने सीएसटी येथून पनवेलकडे येणारी वाहतूक काही काळ खोळंबली आहे. सायंकाळी 4 वाजता ही घटना घडली. ऐन गर्दीवेळी ही घटना घडल्याने प्रवाशांना त्रास झाला आहे. सीएसटीते बेलापूर लोकल सुरळीत सुरु आहेत.
किलोमीटर क्रमांक 47 जवळ ही ओव्हरहेड वायर तुटली आहे. ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याचे काम रेल्वे प्रशासनाच्या मार्फत सुरु आहे. गेल्या 1.5 तासापासून ओव्हरहेड वायर तुटल्याने पनवेल रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी ट्रान्सहार्बर मार्गावरही सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला होता. ट्रान्स हार्बर मार्गावर कोपरखैरणे दरम्यान सिग्नलमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल थांबवण्यात आल्याने सानपाडापर्यंत लोकलच्या रांगा लागल्या होत्या. अखेर सिग्नलमध्ये झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर सुमारे दीड तासानंतर रेल्वेवाहतूक पूर्ववत झाली. यामुळे अर्ध्या प्रवासात थांबलेल्या लोकलमधील प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. तर सिग्नलमधील बिघाडामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने त्यानंतर धावणाºया लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती. तर वाशी, सानपाडा, तुर्भे या रेल्वेस्थानकांवर देखील प्रवाशांची गर्दी झाली होती. ऐन संध्याकाळच्या वेळेस घडलेल्या या बिघाडामुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.