Join us  

हार्बर रेल्वे रखडली

By admin | Published: October 20, 2015 1:51 AM

टिळकनगरजवळ ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांचा सकाळी खोळंबा झाला आणि चाकरमान्यांना त्याचा त्रास भोगावा लागला.

मुंबई :टिळकनगरजवळ ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांचा सकाळी खोळंबा झाला आणि चाकरमान्यांना त्याचा त्रास भोगावा लागला. सेवा पुर्ववत होण्यास पाऊण तासांपेक्षा जास्त वेळ लागला. लोकलच्या टपावरुन प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या चुकीमुळे ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी दिली. सकाळी साडे दहाच्या सुमारास चेंबूर ते टिळकनगर दरम्यान सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ओव्हरहेड वायर तुटली. या घटनेची माहीती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्तीला पाऊण तासाहून अधिक काळ लागला. त्यामुळे काही लोकल फेऱ्या या रद्द करण्यात येत होत्या. दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावणाऱ्या लोकल आणि रद्द करण्यात येत असलेल्या काही लोकल फेऱ्यांमुळे प्रवाशांनी बस, रिक्षा, टॅक्सीचा पर्यायही निवडला. ३0 लोकल फेऱ्या रद्द तर ५६ फेऱ्या उशीर झाल्याचे अमिताभ ओझा यांनी सांगितले.(प्रतिनिधी)