हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प, कामावर निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल; बेस्टकडून ज्यादा बसेसची सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2018 07:48 AM2018-03-01T07:48:06+5:302018-03-01T08:48:22+5:30
सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून वाहतूक विस्कळीत झाली असून हार्बर रेल्वेची अप आणि डाऊन वाहतूक ठप्प झाली आहे
मुंबई - ऐन सकाळी गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. शिवडी रेल्वे स्थानकाजळ ओव्हरहेड वायर तुटल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून वाहतूक विस्कळीत झाली असून हार्बर रेल्वेची अप आणि डाऊन वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान ऐन सकाळी वाहतूक विस्कळीत झाली असल्या कारणाने सर्व स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना स्थानकांवर ताटकळत उभं राहावं लागत आहे. सकाळच्या वेळी सीएसएमटीच्या दिशेने जाणा-या प्रवाशांची संख्या मोठी असते, मात्र सेवा विस्कळीत झाल्याने गर्दी वाढत आहे.
COMMUTERS HOLDING HARBOUR LINE TICKETS/PASSES, CAN TRAVEL FROM KURLA TO CSMT AND BACK ON MAIN LINE TILL HARBOUR LINE SERVICES FROM CSMT TO VADALA ROAD ARE RESTORED
— Central Railway (@Central_Railway) March 1, 2018
CSMT TO VADALA ROAD HARBOUR SERVICES ARE SUSPENDED DUE TO SOME TECHNICAL PROBLEM IN OHE. HOWEVER, VADALA ROAD TO ANDHERI AND VADALA ROAD TO PANVEL SERVICES ARE RUNNING. INCONVENIENCE CAUSED IS DEEPLY REGRETTED. WE ARE TRYING TO NORMALISE SERVICES AS SOON AS POSSIBLE
— Central Railway (@Central_Railway) March 1, 2018
दरम्यान, हार्बर मार्गावरील प्रवाशांना कुर्ला स्थानकातून पुढील प्रवासासाठी मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तसेच वडाळा ते सीएसएमटी दरम्यानच्या प्रवाशांनी बेस्ट बसने पुढील प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केलं आहे. रेल्वेकडून करण्यात आलेल्या विनंतीनंतर बेस्टने हार्बर रेल्वे प्रवाशांसाठी ज्यादा बसेस सोडल्या आहेत. सीएसएमटी ते वडाळा दरम्यान सेवा लवकर सुरळीत होईल असंही मध्य रेल्वेने म्हटलं आहे.