Harbor Train Update: हार्बर रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक दोन तासांनंतर पूर्वपदावर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 08:18 AM2018-09-03T08:18:23+5:302018-09-03T11:36:50+5:30
Harbor Train Update: आठवड्याच्या सुरुवातीलाच हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीलाच हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दोन तासांनंतर ही वाहतूक आता पूर्वपदावर आली आहे. कॉटन ग्रीन स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे सीएसएमटी आणि अंधेरी-पनवेलकडे जाणारी वाहतूक उशिराने सुरू आहे.
#Mumbaiहार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, कॉटन ग्रीन स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली, सीएसएमटी आणि अंधेरी-पनवेलकडे जाणारी वाहतूक उशिराने #Local#Harbourline
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) September 3, 2018
सोमवारी (3 सप्टेंबर) सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हार्बर रेल्वे मार्गावर बिघाड झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. ऑफिस कामासाठी घरातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना लोकल बिघाडामुळे कामावर पोहोचण्यास उशीर झाला. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असेल प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर आता बिघाड दुरुस्त करण्यात आला असून वाहतूक सुरू झाली आहे.
Mumbai: Problem reported in OHE (Overhead Equipment) at Harbour line network between Wadala and Cotton Green stations; restoration work underway, the movement of Mumbai locals is not halted.
— ANI (@ANI) September 3, 2018