धनंजय गावडेंवर बडतर्फीची कारवाई
By admin | Published: June 20, 2014 11:03 PM2014-06-20T23:03:38+5:302014-06-20T23:03:38+5:30
ठाणो जिल्हा काँग्रेस समितीचे सरचिटणीस धनंजय गावडे यांना प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पक्षातून बडतर्फ केले आहे.
Next
>वसई : ठाणो जिल्हा काँग्रेस समितीचे सरचिटणीस धनंजय गावडे यांना प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पक्षातून बडतर्फ केले आहे. काल गुरुवारी प्रदेश सरचिटणीसांनी प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाची प्रत सर्व प्रसिद्धीमाध्यमांना पाठवली. लोकसभा निवडणुकीच्या काळात सेना-भाजपा युतीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याप्रकरणी त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता, परंतु बंडखोरी करून निवडणूक लढवणा:या जिल्हाध्यक्ष दामू शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा यांच्यावर मात्र कारवाई न केल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना पाठींबा देऊन आपल्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास भाग पाडले होते. काँग्रेस पक्षाच्या या निर्णयाचे वसई तालुक्यात जोरदार पडसाद उमटले व अनेक काँग्रेसजनांनी स्वत:ला प्रचारापासून दूर ठेवले. परंतु जिल्हासरचिटणीस धनंजय गावडे यांनी मात्र अॅड. चिंतामण वनगा यांचा प्रचार केला. वसईतील पदाधिका:यांनी काँग्रेस समितीकडे तक्रारी केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी धनंजय गावडे यांना पक्षातून बडतर्फ केले.
या कारवाईचे येथील काँग्रेसजनांनी स्वागत केले असले तरी निवडणुकीच्या काळात बंडखोरी करून उमेदवारी लढवणा:या जिल्हाध्यक्ष दामु शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा यांच्यावर कारवाई का झाली नाही? असा प्रश्न अनेक काँग्रेसजनांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर मात्र त्यांचा विरोध मावळला व त्यांनी आपल्या मुलाला उमेदवारी अर्ज मागे घेणो भाग पाडले. परंतु वेळ निघून गेल्यामुळे मतपत्रिकेवर मात्र त्यांचे नाव आले. याप्रश्नी प्रदेश समिती काय भूमिका घेते याकडे तमाम काँग्रेसजनांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)