अटकेपूर्वीच कनानीने केल्या हार्ड डिस्क नष्ट!

By admin | Published: October 25, 2016 02:30 AM2016-10-25T02:30:01+5:302016-10-25T02:30:01+5:30

कोट्यवधी रुपयांच्या बनावट कॉल सेंटर प्रकरणातील एक प्रमुख आरोपी, मुंबईचा व्यापारी जगदीश कनानी याला बेड्या ठोकण्यात ठाणे पोलिसांना गेल्या रविवारी यश आले.

Hard Disk Destroyed by Canaanite Before Stopping! | अटकेपूर्वीच कनानीने केल्या हार्ड डिस्क नष्ट!

अटकेपूर्वीच कनानीने केल्या हार्ड डिस्क नष्ट!

Next

- राजू ओढे, ठाणे
कोट्यवधी रुपयांच्या बनावट कॉल सेंटर प्रकरणातील एक प्रमुख आरोपी, मुंबईचा व्यापारी जगदीश कनानी याला बेड्या ठोकण्यात ठाणे पोलिसांना गेल्या रविवारी यश आले. त्याने अटकेपूर्वीच तपासात महत्त्वाचा पुरावा म्हणून उपयोगी पडू शकणाऱ्या कॉल सेंटरमधील संगणकांच्या हार्ड डिस्क नष्ट केल्याने पोलिसांची अडचण वाढली आहे. कनानीच्या आतापर्यंतच्या चौकशीतून हेच स्पष्ट झाले असले तरी, त्याने पुरावे नष्ट केले असतील, यावर पोलिसांना सध्यातरी विश्वास नाही. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी आतापर्यंत ७४ आरोपींना अटक केली. त्यापैकी जगदीश कनानीसह ४ आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, उर्वरित ७० आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात कनानीची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे कनानीला बेड्या ठोकणे, हे पोलिसांचे मोठे यश आहे; मात्र त्याच्याकडून ठोस पुरावे मिळवणे पोलिसांसाठी अवघड होऊन बसले आहे.
अमेरिकन नागरिकांकडून खंडणी वसूल करण्यासाठी कॉल सेंटर्समधील ज्या संगणकांच्या मदतीने ‘व्हीओआयपी’ कॉल्स केले जायचे, त्या सर्व संगणकांच्या हार्ड डिस्क कनानीने आधीच नष्ट केल्या आहेत. सूत्रांच्या मते, सर्व हार्ड डिस्कची ड्रील मशीनने तोडफोड करून त्या पाण्यात फेकल्याचे कनानीने पोलिसांना सांगितले आहे. मात्र, अशी खोटी माहिती देऊन तो तपास यंत्रणेची दिशाभूल करीत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तो २६ आॅक्टोबरपर्यंत पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्याच्याकडून हवी ती माहिती पुढील दोन दिवसांतच मिळवावी लागणार आहे.

‘एलओसी’वरच पोलीस अवलंबून
पोलिसांचा आतापर्यंतचा तपास सागर ठक्कर उर्फ शॅगी याच्याभोवती केंद्रित झाला आहे. त्याने भारतातच कुठे आश्रय घेतलाय की, दुसऱ्या कोणत्या देशात पळून गेला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याने भारतातून कुठेही जाण्याचा प्रयत्न केला किंवा कुठूनही भारतात येण्याचा प्रयत्न केला, तर त्याला लगेच पकडता यावे, यासाठी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ‘लूक आउट सर्क्युलर’ (एलओसी) जारी केले आहे. त्यामुळे जिथून जिथून सागर भारताबाहेर पलायन करू शकतो, अशी देशभरातील आंतरराष्ट्रीय बंदरे आणि विमानतळांपर्यंत त्याच्याविषयीची माहिती ठाणे पोलिसांनी पोहोचवली आहे. मात्र, ‘एलओसी’ जारी करून जवळपास दोन आठवडे उलटले तरी अद्याप सागरचा ठावठिकाणा लागलेला नाही.

Web Title: Hard Disk Destroyed by Canaanite Before Stopping!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.