‘लोकमत’चा दणका; म्युनिसिपल बॅँकेतील लिपिक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 05:51 AM2019-12-12T05:51:15+5:302019-12-12T06:15:10+5:30

घोटाळ्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत

Hard earned money is not safe even in the municipal bank; Workers expressed regret | ‘लोकमत’चा दणका; म्युनिसिपल बॅँकेतील लिपिक निलंबित

‘लोकमत’चा दणका; म्युनिसिपल बॅँकेतील लिपिक निलंबित

Next

- मनीषा म्हात्रे

मुंबई : महापालिकेच्या दि म्युनिसिपल को. ऑप. बँकेच्या मुलुंड शाखेतील कोट्यवधीचा आर्थिक गैरव्यवहार ‘लोकमत’ने उघडकीस आणताच, संबंधित लिपिकाला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्याकडून विविध खात्यांतून ८६ लाख वसूल करण्यात आले आहे, तसेच भविष्यात अशी घटना घडू नये, म्हणून पासवर्ड पद्धत बंद करत, ‘बायोमॅट्रिक ऑथोरायझेशन’ पद्धत अंमलात आणण्याचे निर्देश पदसिद्ध अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येत असलेल्या दि म्युनिसिपल बँकेच्या शहरात २२ शाखा आहेत. बँकेमध्ये ८४ हजार ९१२ खाती आहेत. हजारो कोटींमध्ये बँकेचा व्यवहार चालतो. यातच मुलुंड शाखेत लिपिकाने संगणक प्रणालीचा गैरवापर करून ३ कोटी ४९ लाख ६६ हजार ८०५ रुपयांवर डल्ला मारला. यात, आयुक्त प्रवीण परदेशी (पान १२ वर)

दि म्युनिसिपल बँकेच्या मुलुंड शाखेतील गैरव्यवहाराचे प्रकरण उघड होताच महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असली तरी कष्टाने कमावलेले पैसे म्युनिसिपल बँकेतही सुरक्षित नसल्याची नाराजी तसेच असुरक्षिततेची भीती कामगारांमध्ये आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पुढे अशा घोटाळ्यांची पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी घेण्याची मागणी कर्मचारी, कामगार संघटना आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे.

पंजाब नॅशनल बँक, पीएमसी बँक अशा काही बँकांमधील गैरव्यवहार उघड झाल्यानंतर मुंबईकरांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. याच दरम्यान, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या बँकेच्या मुलुंड शाखेतील घोटाळा उघड झाला आहे. पालिकेच्या बहुतांश चतुर्थ श्रेणीतील कर्मचाºयांची खाती दि म्युनिसिपल बँकेच्या २२ शाखांमध्ये आहेत.या सर्व कामगारांचे मासिक वेतन, भविष्य निर्वाह निधी, निवृत्तिवेतन सर्व याच बँकांच्या विविध शाखांमध्ये जमा करण्यात येते. त्यामुळे सुरक्षित वाटणाºया या बँकेतील एका शाखेत घोटाळा उघड झाल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

याबाबत कर्मचाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बँकेत पैसे सुरक्षित असतात असे वाटत असल्याने आम्ही निश्चिंत होतो. पण आता बँकाही असुरक्षित झाल्या असल्याचे पाहायला मिळत असल्याची खंत कर्मचाºयांनी व्यक्त केली. त्यातच म्युनिसिपल बँकेत हा प्रकार घडल्याने ते हवालदिल झाले आहेत.

आमच्या मेहनतीचा पैसा मोठ्या विश्वासाने आम्ही बँकेत जमा करतो. पण तिथेही आमचे कष्टाचे पैसे सुरक्षित नसतील, तर विश्वास कोणावर ठेवायचा, पैसे जम करायचे तरी कुठे? आमच्या घामाच्या पैशांच्या सुरक्षेचीम हमी कोण घेणार, असे अनेक प्रश्न कर्मचाºयांनी उपस्थित केले आहेत.

माहिती मागविली आहे या प्रकरणाची माहिती प्रशासनाकडून मागवली आहे. त्यानंतरच याबाबत काही बोलणे योग्य ठरेल.
- किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई

वेळीच कठोर पावले उचलणे गरजेचे असा घोटाळा एक शिपाई एकटा करू शकत नाही. यामध्ये आणखी कोण-कोण गुंतले आहे, याचा छडा लागायला हवा. आज एका बँकेत ही घटना घडली आहे. असा प्रकार म्युनिसिपल बँकेच्या अन्य शाखेत घडू नये, यासाठी प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा कर्मचाºयांचा विश्वास उडेल.
- रवी राजा, विरोधी पक्षनेते

गंभीर बाब

या आरोपात तथ्य असेल तर ही बाब गंभीर आहे. म्युनिसिपल बँकेचे सभासद असलेल्या हजारो कर्मचाºयांचे पैसे यामध्ये आहेत. याच बँकेमध्ये गैरव्यवहार होत असतील तर कर्मचाºयांनी जायचे कुठे? या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
- रमाकांत बने, सरचिटणीस, दि म्युनिसिपल युनियन

आज खासगी बँका सुरक्षित नाहीत, हे आपण पाहिलेय. परंतु, आता मुंबई महापालिकेची स्वत:ची बँकही सुरक्षित नाही, हे समोर आले आहे. म्युनिसिपल बँकेच्या कारभारात हस्तक्षेप करीत निधीची अफरातफर होत असेल तर ही गंभीर बाब आहे. पैशांची अफरातफर कशाप्रकारे झाली, याची सखोल चौकशी करावी.
- राखी जाधव, गटनेत्या- राष्ट्रवादी काँग्रेस

...तर सभासद पैसे काढून घेतील
बँकेवरील संचालक मंडळाने या प्रकरणात लक्ष घालून फौजदारी कारवाई करणे आवश्यक आहे. कष्टाने कमवलेले पैसे मोठ्या विश्वासाने कर्मचारी बँकेत ठेवतात. त्यांच्या विश्वासाला तडा गेल्यास सभासद आपले सर्व पैसे काढून घेतील आणि भविष्यात म्युनिसिपल बँकच उरणार नाही.
- प्रकाश देवदास, सरचिटणीस, मुंबई महानगरपालिका कार्यालयीन कर्मचारी महासंघ

Web Title: Hard earned money is not safe even in the municipal bank; Workers expressed regret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.