दिघी सागरी पोलिसांचा कडक बंदोबस्त
By admin | Published: October 5, 2014 10:48 PM2014-10-05T22:48:38+5:302014-10-05T22:48:38+5:30
दिघी सागरी पोलीस निवडणुकीसाठी सज्ज झाले असून पोलीस ठाण्याच्यावतीने शनिवारी बोर्लीपंचतन गावातून रुट मार्चिंग घेण्यात आले
बोर्ली पंचतन : दिघी सागरी पोलीस निवडणुकीसाठी सज्ज झाले असून पोलीस ठाण्याच्यावतीने शनिवारी बोर्लीपंचतन गावातून रुट मार्चिंग घेण्यात आले. यामध्ये सीआरएस एफ - १ तुकडी, स्ट्रायकिंग फोर्स - १ तुकडी, पोलीस कर्मचारी यांच्या समवेत श्रीवर्धन विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनीही सहभाग घेतला, तसेच दिघी सागरी पोलीस ठाण्याच्यावतीने मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात येत आहे. वाहनांची चौकशी व तपासणी करुन काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस सतर्क असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली असतानाच १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये पोलीस दलही सज्ज झाले आहे. दिघी सागरी पोलीस ठाण्याच्यावतीने शनिवारी सायंकाळी बोर्लीपंचतन बाजारपेठेतून रुट मार्चिंग घेण्यात आले. यामध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, पोलीस निरीक्षक विकास रामगुडे, पो.उप. नि. प्रवीण रणदिवे, तुरुंबकर यांच्यासह, सीआरएसएफ तुकडी, एक स्ट्रायकिंग फोर्स तुकडी, दिघी सागरी स्टाफ, पीसीआर वाहन यांचा समावेश होता, तसेच पोलीस ठाण्यामार्फत मुख्य नाक्यावर नाकाबंदी करण्यात येते. यामध्ये राजकीय पक्षांकडून कोणत्याही प्रकारे पैशांचे वाटप होवू नये यावर विशेषत: नजर ठेवून असल्याने वाहनांची सखोल तपासणी व चौकशी करण्यात येत आहे. परंतु अद्याप अशा प्रकारची संशयित बाब हद्दीमध्ये आढळली नसल्याचे समजते. (वार्ताहर)