खरिपाची माती, रब्बीत काय लागणार हाती?; सरासरीच्या ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 11:22 AM2023-11-22T11:22:19+5:302023-11-22T11:22:34+5:30
राज्यात सरासरीच्या ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील रब्बी पेरणीला फटका बसला आहे. आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा झालेली पेरणी सुमारे ७८ टक्के इतकी आहे. हरभरा लागवड केवळ ७० टक्के झाली आहे. यामध्ये वाढ होण्याची आशा आहे.
रब्बी आशेवरही पाणी
राज्यात यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना रडवणारा ठरला. त्याची भर रब्बी हंगामात निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, परतीच्या पावसाने ओढ दिल्याने रब्बीच्या आशेवरही पाणी फिरले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत रब्बी ज्वारीचे क्षेत्र ९७ टक्के झाले आहे. त्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे, तर उसाच्या तोडणीनंतर हरभऱ्याच्या लागवडीतदेखील डिसेंबरअखेरपर्यंत वाढ होईल.
- दिलीप झेंडे, संचालक, विस्तार व प्रशिक्षण, कृषी विभाग, पुणे
पेरणी झालेले क्षेत्र १७,४१,०७९ हेक्टर