Join us

हरिसाल गावकऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून धमकाविण्याचे फोन, मनसे नेत्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 8:17 PM

हरिसाल डिजिटल गावाचा मनसेकडून पर्दाफाश करण्यात आल्यानंतर त्या व्हिडीओत दाखवण्यात आलेल्या लोकांवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून आणि पोलिसांकडून दबाव टाकला जातोय.

मुंबई - हरिसाल डिजिटल गावाचा मनसेकडून पर्दाफाश करण्यात आल्यानंतर त्या व्हिडीओत दाखवण्यात आलेल्या लोकांवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून आणि पोलिसांकडून दबाव टाकला जातोय. लोकांना धमकविण्याचा प्रकार त्याठिकाणी घडत आहे. लहान लहान मुलांना धमकावून त्यांच्याकडून व्हिडीओ काढण्याचे गंभीर प्रकार सुरु असल्याचा आरोप मनसे नेते अभिजीत पानसे यांच्याकडून करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना अभिजीत पानसे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून हरिसालमधल्या गावकऱ्यांवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून फोन करुन दबाव टाकण्यात येत आहे. तेथील लोकांना जबरदस्तीने धमकावून व्हिडीओ काढण्याचा प्रकार भाजपाकडून करण्यात येत आहे. काल जो व्हिडीओ हरिसाल गावातून फेसबुक लाईव्ह करण्यात आलं त्याचं युनीट भाजपाकडून पाठविण्यात आलं. गावात सरपंच भेटला नाही म्हणून उपसरपंचाकडून तो लाईव्ह व्हिडीओ करण्यात आला असं अभिजीत पानसे यांनी सांगितले. 

ज्या गरिब गावकऱ्यांवर दबाव टाकून धमकावण्याचा प्रकार भाजपाकडून सुरु आहे, तो वेळीच थांबवा अशाप्रकारे कोणालाही धमक्या किंवा दबाव आणला जात असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठिशी ठामपणे उभी आहे. ज्यांच्यावर अशाप्रकारे दबाव आणलेला आहे त्यातील एकाने फोन करुन आत्महत्या करण्याची वेळ आली आहे अशा शब्दात भिती व्यक्त केली. त्यांना धीर देण्यात आला आहे. मात्र अशाप्रकारे भाजपाकडून खालच्या पातळीला जाऊन गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री कार्यालयातून धमकावण्यात येत आहे. त्यांच्यामागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत असंही मनसे नेते अभिजीत पानसे यांनी सांगितले.   

सोमवारी हरिसालमधून उपसरपंच गणेश येवले यांनी 'राज ठाकरेंनी आपल्या सभांमध्ये हरिसाल गावाविषयी जो व्हिडिओ दाखवला आहे, तो पूर्णपणे खोटा आहे. तसेच राज ठाकरेंनी हरिसाल गावाची जी देशभरात बदनामी केली आहे ती अतिशय चुकीची आहे असं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून म्हटलं होतं. आज जर गावात इंटरनेट नसते तर आज मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधू शकलो नसतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे मनसेकडून पुन्हा भाजपावर प्रत्यारोप करण्यात आला आहे. 

राज ठाकरेंनी आमच्या गावाची बदनामी केली; हरिसालच्या उपसरपंचांचा FB Live वरून 'स्ट्राईक'

 

टॅग्स :लोकसभा निवडणूकमनसेराज ठाकरेडिजिटल