Join us

हरित कचऱ्याचा सदुपयोग

By admin | Published: January 07, 2016 1:50 AM

महापालिकेने चाणक्य इन्स्टिट्यूट आॅफ पब्लिक लीडरशिप संस्थेच्या मदतीने घाटकोपर पश्चिम येथे लालबहादूर शास्त्री मार्गावरील अशोक सिल्क मिलच्या बाजूला

मुंबई : महापालिकेने चाणक्य इन्स्टिट्यूट आॅफ पब्लिक लीडरशिप संस्थेच्या मदतीने घाटकोपर पश्चिम येथे लालबहादूर शास्त्री मार्गावरील अशोक सिल्क मिलच्या बाजूला १ हजार चौरस मीटर जागेवर हरित कचऱ्यापासून पॅलेट्स व बिक्रेट्सचा कारखाना सुरू केला आहे. सध्या या प्रकल्पामध्ये दररोज सुमारे १६ टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सुमारे ८ ते १० टन इतक्या प्रमाणात ‘पॅलेट्स’ व ‘बिक्रेट्स’ची निर्मिती करण्यात येत आहे.महापालिकेकडून गोळा केला जाणारा कचरा देवनार, मुलुंड आणि कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच असून, यावर उपाय म्हणून महापालिकेने चाणक्य इन्स्टिट्यूट आॅफ पब्लिक लीडरशिप या संस्थेशी समन्वय साधून घाटकोपरमध्ये प्रकल्पासाठी १ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा उपलब्ध करून दिली आहे. (प्रतिनिधी)हरित कचऱ्यापासून पॅलेट्स व बिक्रेट्स तयार करण्यात येत असल्याने पालिकेला हरित कचऱ्याची सुयोग्यप्रकारे व कोणताही अतिरिक्त खर्च न करता विल्हेवाट लावता येत आहे. या प्रकल्पासाठी पालिकेच्या एकूण १२ विभाग कार्यालयांच्या क्षेत्रातून हरित कचरा (ग्रीन वेस्ट) गोळा करण्यात येत आहे. सध्या सुमारे १६ टन कचऱ्याचे व्यवस्थापन या प्रकल्पातून होत आहे. मात्र लवकरच हा प्रकल्प अधिक क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे दररोज ४० टन इतक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. तसेच घाटकोपरनंतर पश्चिम उपनगरातही असे प्रकल्प लवकरच राबविण्यात येणार आहेत.- पल्लवी दराडे, अतिरिक्त महापालिका आयुक्तहरित कचरा (ग्रीन वेस्ट) गोळा करून त्याचे परिमंडळनिहाय अशा स्वरूपाचे पॅलेट्स आणि बिक्रेट्स उत्पादन करावे, हे महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार संस्थेला ही जागा पाच वर्षांच्या मुदतीवर उपलब्ध करून देण्यात आली. सद्य:स्थितीमध्ये त्याच जागेवर झाडांचा पालापाचोळा, फांद्या यासारख्या सुमारे १६ टन इतक्या हरित कचऱ्यापासून पॅलेट्स व बिक्रेट्स तयार करण्यात येत आहेत.