Join us  

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय का?; खुद्द जयंत पाटलांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 12:52 PM

 काल राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात मोठा धक्का दिला.

मुंबई-  काल राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात मोठा धक्का दिला. 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शरद पवार यांनी अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. यानंतर राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही राजीनामा दिल्याची चर्चा रंगू लागली. या चर्चेवर आता माजी मंत्री आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण आले आहे. 

सुप्रिया सुळे होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा? आजच घोषणेची शक्यता

माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन राजीनामा दिला नसल्याचे स्पष्टीकरण पाटील यांच्या कार्यालयाकडून देण्यात आले आहे. तसेच या संदर्भात अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. 

काल शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. यावेळी बालताना पाटील म्हणाले, आम्ही सगळी राज्यात पवार साहेब यांच्या नावावर मत मागतो, आता पवार साहेब बाजूला गेले तर आम्ही कुणाकडे पाहून मत मागायची. आताही राष्ट्रवादी पक्ष पवार साहेब यांच्या नावावर ओळखतो त्यामुळे असं अचानक शरद पवार यांनी बाजूला जाण्याचा निर्णय घेण बरोबर नाही. त्यांनी राजीनाम्याचा निर्णय  मागे घ्यावा, असंही जयंत पाटील म्हणाले. यावेळी बोलताना जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. यावेळी सभागृहात एकच शांतता होती. 

" तुम्ही अलिकडे भााकरी फिरवण्याचे म्हणाला, पवार साहेब आम्ही सगळे अधिकार तुम्हाला देतो. पण, तुम्ही राजीनाम्याचा निर्णय मागे घ्या. तुम्हाला पक्ष नव्या लोकांच्या हातात कसा द्यायचा आहे तो द्या पण तुम्ही हा निर्णय मागे घ्या. तुम्ही बाजूला जाऊन आम्ही कोणीच काम करु शकणार नाही. तुम्ही थांबणार असाल तर आम्ही सगळे थांबतो. हा पक्ष ज्यांना चालवायचे आहे त्यांना चालवू दे, असंही जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.    

टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारसुप्रिया सुळे