Join us

MSEB: लाईटबील अव्वाच्या सव्वा आलंय? मग कोठे तक्रार कराल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 1:26 PM

जर तुम्ही वापरलेल्या वीजेपेक्षा तुम्हाला आलेलं बिल अधिक असल्याचं आपणास वाटत असेल तर, तुम्ही संबंधित विभागाची तक्रार करू शकता

एकीकडे वीजदरात झालेली वाढ आणि दुसरीकडे थंडीचे दिवस असल्याने वीजबिलाचा आकडा चांगलाच वाढल्याचं दिसून येतं. अनेकदा आपल्या लाईट बिलावर संबंधित कंपनीकडूनही अधिकचा भार लावून वीज बिल आकारणी केली जाते. त्यातच, सध्या थंडीचे दिवस असल्याने घरातील गिझर सकाळपासूनच सुरू असते. त्यामुळेही वीजबिलात वाढ झाल्याचं दिसून येतं. पण, कधी अपेक्षेपेक्षा जास्त वीज बिल आल्यानंतर काय करावे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो. 

जर तुम्ही वापरलेल्या वीजेपेक्षा तुम्हाला आलेलं बिल अधिक असल्याचं आपणास वाटत असेल तर, तुम्ही संबंधित विभागाची तक्रार करू शकता. तुम्ही ज्या भागात राहता तेथील स्थानिक ग्राहकांसाठी एक टोल फ्री तक्रार क्रमांक असतो. जर, तुम्ही नोएडा येथे राहत असाल तर, (0120 – 6226666, 2333555, 2333888) या क्रमांकावर कॉल करू शकता. तसेच, संबंधित विभागाच्या ई-मेल अड्रेसवर तक्रारी मेल पाठवू शकता. 

महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाचा हा ट्रोल क्रमांक आहे - १८००-२३३-३४३५. ज्यावर तुम्ही कॉल करु शकता. टोल फ्री क्रमांक, पोर्टल, मोबाईल अ‍ॅपद्वारे आणि ट्विटर, फेसबुक इत्यादी सोशल मीडियावरुन ग्राहकांना बिलिंग तक्रारी, वीज संबंधित तक्रारी आणि विविध अनुप्रयोगांच्या प्रश्नांसाठी तक्रारी नोंदवता येतील. सर्व तक्रारी सीआरएम सॉफ्टवेअरमध्ये नोंदविल्या जातात आणि निपटारासाठी एसएमएस पाठवून संबंधित फील्ड ऑफिसरला देण्यात येतात, असे एमएसईबीच्या पोर्टलवर देण्यात आले आहे. 

या ई-मेल अॅड्रेसवरही तुम्ही तक्रार करू शकता. customercare@mahadiscom.in. तसेच, 1800-212-3435, 1800-233-3435 हे दोन्ही टोल फ्री संपर्क नंबर आहेत. 

ग्राहक तक्रार निवारण केंद्राला भेट

शहरी भागातील ग्राहकांसाठी विविध ग्राहक सेवांसाठी एक सिंगल विंडो सुविधा जसे कीअनुप्रयोग स्वीकारत आहे आणि पोच जारी करीत आहेतक्रार निवारणबिलिंग संबंधित सेवादेयक संग्रह – डीओएफकडून प्राप्त करण्याचे निर्देशमाहिती हेल्पडेस्क 

टॅग्स :वीजबिल