युतीसाठी मनसेने ठाकरे गटाला प्रस्ताव दिला? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 03:09 PM2023-07-06T15:09:29+5:302023-07-06T15:10:18+5:30

मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज सकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.

Has MNS proposed to Thackeray group for alliance? Raj Thackeray clearly said | युतीसाठी मनसेने ठाकरे गटाला प्रस्ताव दिला? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

युतीसाठी मनसेने ठाकरे गटाला प्रस्ताव दिला? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

googlenewsNext

मुंबई- मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज सकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलट-सुटल चर्चा सुरू झाल्या. मनसेने ठाकरे गटाकडे युतीसाठी प्रस्ताव दिल्याची चर्चा सुरू झाली. यानंतर आता स्वत: मनसे नेते राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रीया दिली. ठाकरे गटासोबत युती संदर्भात सुरू असलेल्या चर्चेवर त्यांनी स्पष्टी करण दिले. 

मनसे-ठाकरे गट युतीसाठी उचललं पहिलं पाऊल?; अभिजित पानसे- संजय राऊतांची झाली भेट

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युतीसाठी ठाकरे गटापुढे कोणताही प्रस्ताव ठेवला नसल्याचे स्पष्ट करत या चर्चेतील हवाच काढून टाकली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे गटाला युती संदर्भात कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितले. या चर्चांवर ठाकरे गटाकडूनही स्पष्टीकरण आले आहे, खासदार संजय राऊत यांनी सांगितले, असा कोणताही प्रस्ताव मनसेकडून आलेला नाही. 

दरम्यान, अभिजीत पानसे यांनीही यावर प्रतिक्रीया दिली. त्यांनी युतीचा प्रस्ताव दिल्याच्या फेटाळून लावल्या. पानसे म्हणाले, मी संजय राऊत यांना युतीचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. मी फार छोटा माणूस आहे. राज व उद्धव ठाकरेंनी एकत्र यायचे की नाही, याचा निर्णय दोघांनीच घ्यायचा आहे. पक्षात माझ्याहून अनेक वरिष्ठ नेते आहेत.युती संदर्भाात तसा काही प्रस्ताव असेल तर पक्षातील वरिष्ठ नेते यावर चर्चा करतील, असंही पानसे म्हणाले. 

आज सकाळी मनसे नेते अभिजीत पानसे यांनी खासदार संजय राऊत यांची सामना कार्यालयात भेट घेतली. या दोघांमध्ये १५ मिनिट चर्चा झाली. त्यापूर्वी दोघांनी भांडूप ते सामना कार्यालयातपर्यंत एकत्र कारने जवळपास सव्वा तास प्रवास केला. म्हणजेच या दोन्ही नेत्यांमध्ये आज जवळपास दीड तास चर्चा झाली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. 

Web Title: Has MNS proposed to Thackeray group for alliance? Raj Thackeray clearly said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.