हसन मुश्रीफ यांच्या मुलांना तूर्तास दिलासा, ईडीच्या अटकेपासून दिलेले संरक्षण न्यायालयाने कायम ठेवले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 11:51 AM2023-06-02T11:51:01+5:302023-06-02T11:52:32+5:30

ईडीच्या कारवाईपासून दिलेले अंतरिम संरक्षण कायम ठेवले

Hasan Mushrif son's get relief till June 14, Protection from arrest by ED retained | हसन मुश्रीफ यांच्या मुलांना तूर्तास दिलासा, ईडीच्या अटकेपासून दिलेले संरक्षण न्यायालयाने कायम ठेवले

हसन मुश्रीफ यांच्या मुलांना तूर्तास दिलासा, ईडीच्या अटकेपासून दिलेले संरक्षण न्यायालयाने कायम ठेवले

googlenewsNext

मुंबई : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची मुले नावीद, आबीद आणि साजिद यांना ईडीच्या अटकेपासून दिलेले संरक्षण विशेष न्यायालयाने तूर्तास कायम ठेवले आहे. १४ जूनपर्यंत ईडीने कारवाई करू नये, असे निर्देश सत्र न्यायालयाने दिल्याने मुश्रीफ यांच्या मुलांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

कोल्हापुरातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर छापे मारले असून, या प्रकरणी अटक होऊ नये म्हणून हसन मुश्रीफ यांची मुले नाविद, आबिद आणि साजिद यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

या अर्जावर गुरुवारी सत्र न्यायालयात न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. मात्र इतर प्रकरणांच्या सुनावणीमुळे या प्रकरणावर सुनावणी होऊ शकली नाही, त्यामुळे न्यायालयाने सुनावणी १४ जूनपर्यंत पुढे ढकलली. तसेच ईडीच्या कारवाईपासून दिलेले अंतरिम संरक्षण कायम ठेवले.

Web Title: Hasan Mushrif son's get relief till June 14, Protection from arrest by ED retained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.