देवेंद्र फडणवीस यांच्यावरून समर्थक विरुद्ध विरोधकांमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन ट्विटरवर रंगले हॅशटॅग युद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 10:18 AM2019-11-05T10:18:54+5:302019-11-05T10:28:35+5:30

मुख्यमंत्र्याचे समर्थक व मुख्यमंत्र्यांचे विरोधक यांच्यामध्ये ट्विटरवर हॅशटॅग युद्ध रंगले आहे.

Hashtags waged war on Twitter from CM Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीस यांच्यावरून समर्थक विरुद्ध विरोधकांमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन ट्विटरवर रंगले हॅशटॅग युद्ध

देवेंद्र फडणवीस यांच्यावरून समर्थक विरुद्ध विरोधकांमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन ट्विटरवर रंगले हॅशटॅग युद्ध

Next

मुंबई: राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटल्यानंतर देखील सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि शिवसेनेत चढाओढ सुरु आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात ट्विटरवर युजर्सकडून  #RejectFadnavisForCM हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला होता. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी देखील #MaharashtraNeedsDevendra हा हॅशटॅग वापरत मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीसचं व्हावे असं मत व्यक्त केले आहे. त्यामुळे सध्या मुख्यमंत्र्याचे समर्थक व मुख्यमंत्र्यांचे विरोधक यांच्यामध्ये ट्विटरवर हॅशटॅग युद्ध रंगले आहे.

विधानमंडळाच्या शेवटच्या भाषणात मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं म्हणत पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचा विश्वास व्यक्त केला होता. मात्र शिसेनेनं ठरल्याप्रमाणे सत्तेत 50-50चा आग्रह धरत अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाचीही मागणी करत असल्याने भाजपासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यातच शिवसेनेचे नेते संजय राऊत वारंवार शिवसेनेचाचं मुख्यमंत्री होणार असून त्याचा शिवतिर्थावर शपथविधी संपन्न होईल असा दावा करत आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, महाराष्ट्राला नव्या सरकारची आवश्यकता आहे आणि ते लवकरच बनेल, एवढेच सांगितले. मात्र युतीचे सरकार येणार की भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार या बाबतची संदिग्धता कायम ठेवली. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय सद्यस्थितीवर चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Hashtags waged war on Twitter from CM Devendra Fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.